Join us

विमान तिकिटांच्या ‘मनमानी’वरून संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 5:24 AM

सुट्ट्यांचा काळ जवळ येताच विमानसेवा कंपन्या भरमसाठ तिकीट दर आकारत असल्याबद्दल संसदीय समितीने संताप व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : सुट्ट्यांचा काळ जवळ येताच विमानसेवा कंपन्या भरमसाठ तिकीट दर आकारत असल्याबद्दल संसदीय समितीने संताप व्यक्त केला आहे. हे तिकीट दर ‘मनमानी’ आहेत. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे.विमानांचे तिकीटदर सातत्याने बदलते असतात. सुट्ट्या व सणांचा काळ सुरू होताच दर वधारतात. यावर संसदेच्या परिवहन, पर्यटन व सांस्कृतिक समितीने तीव्र आक्षेप घेतला आहे. अनेकदा हे दर आगाऊ बुकिंगपेक्षा दहापट अधिक असतात. ही कंपन्यांची निव्वळ मनमानी आहे, असे मत समितीने नोंदवले आहे.समितीच्या या अहवालावरील कृती अहवाल सरकारने राज्यसभेत मांडला. त्यात सरकारने कंपन्यांचीच बाजू मांडली. बाजारातील स्थिती व मागणीनुसार जागतिक निकषांवर आधारित हे दर असतात, असे सरकारने कृती अहवालात मांडले आहे. सरकारच्या कृती अहवालावर समितीने नाराजी व्यक्त केली आहे.मंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणीकेरळमधील पुरावेळी विमानसेवा कंपन्या याच पद्धतीने भरमसाठ तिकीट आकारत होते. त्यावेळी नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी टष्ट्वीटरवरुन त्यांना समज दिली होती. तसेच प्रभू यांनी करावे, अशी मागणी समितीने केली.

टॅग्स :विमानव्यवसाय