नवी दिल्ली : हवाई प्रवासी वाहतुकीच्या वृद्धीबाबत यंदा भारताने अमेरिका आणि चीनसारख्या बड्या देशांवर मात केली आहे. यंदा भारतात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १0 कोटींवर जाणार आहे. जगात दुसऱ्या स्थानी असलेला देश (चीन) विमान प्रवास वृद्धीच्या बाबतीत आमच्या जवळपासही नाही. चीनचा वाढीचा दर 10.9टक्के आहे. 2017 पर्यंत भारतात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १00 दशलक्षांवर जाईल, असे सिडनी येथील ‘सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन’ (कापा) या संस्थेने नमूद केले होते. भारतातील हवाई प्रवासी वाहतुकीचा वाढीचा दर गेल्या अनेक महिन्यांपासून 20%पेक्षा जास्त आहे. एप्रिलमध्ये विमान प्रवासाचा वृद्धीदर शिखरावर पोहोचतो. यंदा तो 20.93टक्के होता. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे हवाई मार्केट बनेल‘डीजीसीए’प्रमुख एम. सत्यवती यांनी सांगितले की, भारतातील देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाकडे १,२00 विमाने आहेत. शेड्युल्ड विमान कंपन्यांकडील विमानांची संख्या ४00 पेक्षा जास्त आहे. या क्षेत्रातील वाढीचा २0 टक्के वेग लक्षात घेता आगामी काही वर्षांत भारतीय कंपन्यांकडील विमानांची संख्या किती होईल, याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. शेड्युल्ड विमान कंपन्या देशभरातील ८0 विमानतळांवरून उड्डाणे भरतात. या कंपन्यांपैकी २२ कंपन्या नागरी आणि लष्करी अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीचे काम करतात. गेल्या मार्चमध्ये हैदराबाद येथे इंडियन एव्हिएशन कॉन्फरन्स भरली होती. २0२0 पर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे हवाई मार्केट बनेल, असे परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालात म्हटले होते. चालू वर्षात जानेवारी ते एप्रिल या काळात भारतीय विमान कंपन्यांनी ३ कोटी स्वदेशी प्रवाशांची वाहतूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के जास्त प्रवाशांनी या काळात विमान प्रवास केला. हा आकडा उत्साहवर्धक आहे. हीच गती कायम राहिल्यास १0 कोटी भारतीय यंदा विमानाने प्रवास करतील, असे दिसते. हा आकडा संपूर्ण जगात मोठा असेल. - एम. सत्यवती, ‘डीजीसीए’प्रमुख
हवाई वाहतूक तेजीत!
By admin | Published: May 24, 2016 4:04 AM