Join us

‘विमान कंपन्यांनी प्रवाशापर्यंत फायदा पोहोचवावा’

By admin | Published: February 02, 2016 3:00 AM

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने विमानाच्या इंधनाचे दरही कमी झाले आहेत. त्याचा नागरी हवाई वाहतूक कंपन्यांनाही लाभ होत

कोची : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने विमानाच्या इंधनाचे दरही कमी झाले आहेत. त्याचा नागरी हवाई वाहतूक कंपन्यांनाही लाभ होत असून त्यांनी तो प्रवाशांपर्यंत पोहोचवावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. अर्थात विमान कंपन्यांना तिकीटाचे दर कमी करण्याची केवळ सूचना करणार असून त्याचा निर्णय मात्र कंपन्याच घेतील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.क्रुड आॅईलच्या किमतीत सातत्याने चढउतार होत असतात. अनेकदा विमान कंपन्यांना चढ्या दरामुळे मोठा फटकाही बसतो. मात्र त्यांना तातडीने तिकीट दर वाढविणे शक्य नसते. आता मात्र उलट स्थिती आहे. जागतिक बाजारात तेलाच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे. त्यामुळे विमानांच्या इंधनावरील खर्चात मोठी बचत झाली आहे. त्यामुळे कंपन्यांनी आता दरकपात करावी. तशी सूचना आपण कंपन्यांना करू, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितल