मंबई- अमेरिकावारीस निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रधान सचिवांचा व्हिसा नसल्याने विमान थांबवून ठेवण्याचे आदेश दिले किंवा कसे याची नागरी उड्डाण मंत्रालयाबरोबरच राज्य सरकारच्यावतीनेही चौकशी केली जाणार असल्याचे खुद्द फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.फडणवीस म्हणाले की, त्या घटनेबाबत आपण यापूर्वी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या विमानातील सहप्रवाशांनी कुठली तक्रार केली नाही. उलटपक्षी आपण कसे वेळेवर पोहोचलो होतो तेच सांगितले. मात्र त्याचवेळी एक ई-मेल प्रसारित झाला व त्याद्वारे आपल्यावर दोषारोप केले गेले. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी त्या घटनेची चौकशी करावी, अशी विनंती आपण केली आहेच. त्याखेरीज राज्य सरकारही चौकशी करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विमान थांबवण्याची विनंती केली किंवा कसे ही बाब त्या चौकशीतून उघड होईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
विमान रखडल्याची चौकशी, मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई- अमेरिकावारीस निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रधान सचिवांचा व्हिसा नसल्याने विमान थांबवून ठेवण्याचे आदेश दिले किंवा कसे याची नागरी उड्डाण मंत्रालयाबरोबरच राज्य सरकारच्यावतीनेही चौकशी केली जाणार असल्याचे खुद्द फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM2015-07-12T23:56:37+5:302015-07-12T23:56:37+5:30