नवी दिल्ली: गेल्या काही दिवसापासून विमान प्रवासाचा खर्च वाढला होता, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच होते. त्यामुळे विमान प्रवासाचे भाडे वाढतच होते, पण आता विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता लवकरच विमान प्रवास स्वस्त होणार आहे. एव्हिएशन टर्बाइन इंधनच्या किमतीत आज शनिवारी ४.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे विमान प्रवास स्वस्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
याअगोदर पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात एटीएफ इंधनाच्या किमती ०.७ टक्क्यांनी कमी केल्या होत्या. यावेळी ८७४ रुपये प्रति किलोलीटर असा दर होता.
पीएम मोदींच्या ताफ्याने रुग्णवाहिकेसाठी केला मार्ग मोकळा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
आता एव्हिएशन टर्बाइ इंधनाच्या दरात घट झाल्यामुळे विमानाचे भाडे कमी होणार आहे. एव्हिएशन टर्बाइन इंधनाचा वापर विमानांसाठी केला जातो.हे जेट आणि टर्बो-प्रॉप इंजिनसह विमानांना उर्जा देण्यासाठी वापरले जाते.
स्वस्त झाला गॅस सिलिंडर
नवरात्रीच्या कालावधीत एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत (LPG Latest Price) ही कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. IOCL नुसार, 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 25.5 रुपये, कोलकाता 36.5 रुपये, मुंबई 32.5 रुपये, चेन्नईमध्ये 35.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
दिल्लीत इंडेनचा 19 किलोचा सिलिंडर 1885 रुपयांऐवजी आता 1859.5 रुपयांना मिळणार आहे. तर कोलकात्यात 1995.50 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होईल. यापूर्वी हा सिलिंडर 1959 रुपयांना मिळत होता. त्याचबरोबर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1844 रुपयांऐवजी 1811.5 रुपयांना मिळेल. तर चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 2009.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी चेन्नईत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 2045 रुपये होती.
नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्या
शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी 40 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे येत्या काळात वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस देशात महाग होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती 27 रुपयांनी वाढून 6,727 रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर कच्च्या तेलाच्या ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरीसाठी कराराच्या किमतीत वाढ झाली आहे. ऑक्टोबरमधील डिलिव्हरीचा करार 27 रुपये किंवा 0.4 टक्क्यांनी वाढून 6,727 रुपये प्रति बॅरल झाला. यामध्ये 6,085 लॉटचा व्यवसाय झाला होता. व्यावसायिकांद्वारे आपल्या व्यवहाराचा आकार वाढवल्यामुळे कच्च्या तेलाच्या वायदा किमतीत वाढ झाल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम".