Lokmat Money > बिझनेस न्यूज > AirAsia offer : अवघ्या दोन हजारात करा विदेशात हवाई सफर

AirAsia offer : अवघ्या दोन हजारात करा विदेशात हवाई सफर

जर तुम्ही विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा हा प्लॅन आता फक्त दोन हजार रुपयांत पूर्ण होऊ शकणार आहे. एवढेच, नाही तर देशात सुद्धा हवाई सफर करण्यासाठी 849 रुपये मोजावे लागणार आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 01:30 PM2018-03-26T13:30:48+5:302018-03-26T13:32:07+5:30

जर तुम्ही विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा हा प्लॅन आता फक्त दोन हजार रुपयांत पूर्ण होऊ शकणार आहे. एवढेच, नाही तर देशात सुद्धा हवाई सफर करण्यासाठी 849 रुपये मोजावे लागणार आहेत. 

AirAsia offer: Get air travel abroad in just two thousand | AirAsia offer : अवघ्या दोन हजारात करा विदेशात हवाई सफर

AirAsia offer : अवघ्या दोन हजारात करा विदेशात हवाई सफर

Highlightsदोन हजारात करा विदेशात हवाई सफर 26 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान तिकीट बुकिंग करताना येणारदेशांतर्गत हवाई सफर करण्यासाठी 849 रुपये मोजावे लागणार

नवी दिल्ली : जर तुम्ही विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा हा प्लॅन आता फक्त दोन हजार रुपयांत पूर्ण होऊ शकणार आहे. एवढेच, नाही तर देशात सुद्धा हवाई सफर करण्यासाठी 849 रुपये मोजावे लागणार आहेत. 
एअर एशिया या विमान कंपनीने ही ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये 26 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान तिकीट बुकिंग करताना येणार आहे. विदेशात विमान प्रवास करायचा असेल तर सुरुवातील 1999 रुपये लागणार आहेत आणि स्थानिक म्हणजेच देशांतर्गत प्रवासासाठी 849 रुपये खर्च करावे लागणार आहेत.  
या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला एअरलाइनच्या वेबसाइटवर तिकीट बुकिंग करावे लागणार आहे. तसेच, एअरलाइनच्या अॅपवरुन या ऑफरची बुकिंग करता येणार नाही.  या ऑफरमध्ये 26 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान तिकीट बुकिंग केल्यास तुम्हाला पुढील सात महिन्यानंतरची तारीख प्रवास करण्यासाठी निवडावी लागणार आहे. 
या ऑफरच्या माध्यमातून देशांतर्गत बंगऴुरु, रांची, जयपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टनम, नागपूर, इंदोर, कोची, हैदराबाद पुणे, गुवाहाटी, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये विमान प्रवार करता येणार आहे. तसेच, विदेशात कुआलालंपुर बॅकॉंक, मेलबर्न यासह अन्य काही ठिकाणी प्रवास करता येणार आहे.   
 

Web Title: AirAsia offer: Get air travel abroad in just two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास