Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने तस्करी रोखण्यास विमान कर्मचारी रडारवर

सोने तस्करी रोखण्यास विमान कर्मचारी रडारवर

सोन्याच्या तस्करीमध्ये विमानातील आणि जमिनीवर व्यवस्था बघणारे विमान कंपन्यांचे कर्मचारी सक्रिय असल्यामुळे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून

By admin | Published: August 23, 2015 10:40 PM2015-08-23T22:40:42+5:302015-08-23T22:40:42+5:30

सोन्याच्या तस्करीमध्ये विमानातील आणि जमिनीवर व्यवस्था बघणारे विमान कंपन्यांचे कर्मचारी सक्रिय असल्यामुळे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून

Aircraft personnel on the radars to prevent gold smuggling | सोने तस्करी रोखण्यास विमान कर्मचारी रडारवर

सोने तस्करी रोखण्यास विमान कर्मचारी रडारवर

नवी दिल्ली : सोन्याच्या तस्करीमध्ये विमानातील आणि जमिनीवर व्यवस्था बघणारे विमान कंपन्यांचे कर्मचारी सक्रिय असल्यामुळे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते बाहेर जाताना त्यांची व्यापक झडती घेण्यात येणार आहे.
गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या तस्करीच्या उघडकीस आलेल्या घटनांतील ८० घटनांमध्ये विमानातील आणि जमिनीवर वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी गुंतलेले असल्याचे आढळले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर कर्मचाऱ्यांची झडती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
विमानात सेवा देणाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांची (ज्यांचा येणाऱ्या प्रवाशांशी संबंध येतो) ते जेव्हा विमानतळाबाहेर जातील त्या प्रत्येक वेळी तपासणी होणे आवश्यक आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
हा निर्णय महसूल गुप्तचर महासंचालकांनी विमान कंपन्या, स्थलांतर, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा शुल्क व दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकाऱ्यांच्या १९ आॅगस्ट रोजी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Aircraft personnel on the radars to prevent gold smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.