Join us

Airfare Hike : सणासुदीला विमान प्रवास महागला; 200 टक्क्यांपर्यंत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 4:47 PM

Airfare Hike : येत्या दिवाळीत हवाई सफर करण्याच्या तुमचा प्लॅन असेल तर नक्कीच खिशाला कात्री बसणार आहे.

अहमदाबाद : येत्या दिवाळीत हवाई सफर करण्याच्या तुमचा प्लॅन असेल तर नक्कीच खिशाला कात्री बसणार आहे. दिवाळी फेस्टिव्ह सीजनमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचाच फायदा विमान कंपन्यानी उठवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई, गोवा आणि बंगळुरु यासारख्या शहरांमध्ये जाण्यासाठी विमान तिकीट दरात 45 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर जयपूर, डेहराडून आणि बागडोगरा यांसारख्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी विमान तिकीटात दुप्पट वाढ केली आहे. तसेच, अन्य काही ठिकाणच्या प्रवासासाठी 200 टक्क्यांपर्यंत तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. 

विमान तिकीट दरात करण्यात आलेली वाढ किरकोळ असल्याचे ट्रॅव्हल एजेंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नॅशनल कमिटीचे सदस्य हितांग शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, फेस्टिव्ह सीजनमध्ये विमान प्रवाशांची संख्या वाढते. यामध्ये  तिकीट दरात वाढ करणे स्वाभाविक आहे. त्यामुळे देशांतर्गत अथवा विदेशात प्रवास करण्यासाठी अॅडव्हान्समध्ये तिकीट बुकिंग करण्याचा सल्ला दिला जातो. 

एका टूर ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, विमान तिकीट दर दुप्पट होण्यामागे तिकीट बुकिंग एजेंट आहेत. कारण आधीच ते सर्व तिकिटांची बुकिंग करतात. यामुळे विमानात कमी सीट उपलब्ध होतात आणि दरात वाढ होते. एजेंट स्वत: तिकीटे चढ्या दराने विकतात. 

टॅग्स :विमानविमानतळपर्यटन