Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...म्हणून एकमेव प्रवाशासह विमानं करतात उड्डाण; समोर आलं 'महत्त्वाचं' कारण

...म्हणून एकमेव प्रवाशासह विमानं करतात उड्डाण; समोर आलं 'महत्त्वाचं' कारण

वंदे भारत अभियान; परतताना मिळतात मुबलक प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 05:37 AM2021-05-30T05:37:38+5:302021-05-30T05:37:38+5:30

वंदे भारत अभियान; परतताना मिळतात मुबलक प्रवासी

airline companies gets enough passengers while coming back after it flies with only one passenger | ...म्हणून एकमेव प्रवाशासह विमानं करतात उड्डाण; समोर आलं 'महत्त्वाचं' कारण

...म्हणून एकमेव प्रवाशासह विमानं करतात उड्डाण; समोर आलं 'महत्त्वाचं' कारण

-सुहास शेलार

मुंबई : केवळ एका प्रवाशाला घेऊन ३६० सीटर विमाने दुबईच्या दिशेने रवाना होत असल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशावेळी फेऱ्या रद्द करण्याऐवजी विमान कंपन्या तोटा का सहन करत असतील, असा प्रश्न सामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर असे की, दुबईला गेलेली ही विमाने परतताना वंदे भारत अभियानांतर्गत प्रवासी घेऊन येत असल्याने त्यातून तूट भरून निघते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

१९ मे रोजी ३६० सीटर, तर २२ मे रोजी २५६ सीटर विमानाने एकमेव प्रवाशासह दुबईसाठी उड्डाण केले. हा प्रवास अडीच ते तीन तासांचा असून,  त्यासाठी जवळपास १७ टन इंधन खर्च होते. त्याचे बाजारमूल्य ८ लाख रुपये आहे. कोरोनामुळे हवाई क्षेत्र तोट्यात असताना एका प्रवाशासाठी इतका खर्च विमान कंपनीला परवडतो कसा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने ‘लोकमत’ने त्याचा मागोवा घेतला.

मुंबईतून विमाने रिकामी जात असली, तरी दुबईहून परतताना सीट फुल्ल असतात. वंदे भारत अभियानांतर्गत या विशेष फेऱ्यांचे नियोजन केले जाते. त्याचे भाडेही इतर फेऱ्यांच्या तुलनेत अधिक असते. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध भारताने वाढविल्याने ‘वंदे भारत’शिवाय प्रवाशांकडे अन्य पर्याय  नाही. त्यांना चढ्या दरात तिकीट घ्यावे लागते. त्यामुळे आपोआपच रिकाम्या फेरीचा खर्चही यातून वसूल होतो.

संयुक्त अरब अमिरतीने (यूएई) भारतीय प्रवाशांच्या आगमनावर बंदी घातली असली, तरी तेथून भारतात येणाऱ्यांवर निर्बंध नाहीत. शिवाय एअर इंडिया, अमिरात एअरलाईन या दोनच विमान कंपन्या पूर्ण क्षमतेने सेवा देत असल्याने दुबईत त्यांना बरेच प्रवासी मिळत आहेत. दुबईहून येणारी विमाने दिल्ली  किंवा मुंबई या मोठ्या विमानतळांवर उतरण्याआधी कोची, मंगळुरू, तिरुवनंतपुरम, अहमदाबाद या मार्गे प्रवाशांना सोडून येत असल्याने फेऱ्यांना प्रतिसाद वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुबईतून मुंबईत आलेले प्रवासी
तारीख    प्रवासी    फेरी
२६ मे    २३०    दुबई - तिरुवनंतपुरम-मुंबई
२५     २३८    दुबई-कोची-मुंबई
२२ मे    २३३    दुबई-मुंबई
१९     २४५    दुबई - तिरुवनंतपुरम-मुंबई

Web Title: airline companies gets enough passengers while coming back after it flies with only one passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.