Airtel Prepaid Plans: दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने काल म्हणजेच 4 मे रोजी आपल्या युझर्ससाठी चार नवीन प्लॅन लॉन्च केले होते आणि आज एअरटेलनं देखील रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी दोन नवीन रिचार्ज प्लॅन्स बाजारात आणले आहेत. या प्लॅनची किंमत ३९९ आणि ८३९ रुपये इतकी आहे. एअरटेलच्या दोन्ही प्लॅनसह युझर्सना नेमके कोणकोणते फायदे मिळतील. तसंच दोन्ही प्लॅन्स किती दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहेत हे जाणून घेऊयात.
Airtel 399 Plan Details
Airtel च्या या प्लॅनमध्ये कंपनी आपल्या वापरकर्त्यांना दररोज 2.5 GB हाय-स्पीड डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग तसंच दररोज 100 SMS ऑफर करत आहे. इतर फायद्यांबद्दल सांगायचं तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला तीन महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन, ३० दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, Shaw अॅकॅडमीचे मोफत ऑनलाइन कोर्स, अपोलो २४/७ सर्कल मेंबरशिप, मोफत हॅलो ट्यून आणि विंक म्युझिकसोबतच FasTag वर कॅशबॅक उपलब्ध असेल.
Airtel 839 Plan Details
या प्लॅनमध्ये कंपनी आपल्या युझर्सना 84 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा आणि दररोज 100 SMS सह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळेल.
या प्लॅनमध्ये 3 महिन्यांचे मोफत Disney Plus Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन, Shaw अकादमी येथे मोफत ऑनलाइन कोर्स, 30 दिवसांचा Amazon Prime Video Mobile Edition, मोफत Hello Tune, Apollo 24/7 सर्कल मेंबरशिप आणि बरेच काही मिळते. Wink म्युझिकसह FasTag वर कॅशबॅक उपलब्ध आहे.