ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - रिलायन्स जिओच्या मोफत सेवेमुळे सर्वच टेलीकॉम कंपन्यांचं धाबं दणाणलं आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या सेवा सुरू करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने देशभरात रोमिंग फ्री केल्याची घोषणा केली.
एअरटेलच्या व्हॉईस आणि डेटा सेवेसाठी आता रोमिंग शुल्क लागणार नाही. केवळ व्हॉईस आणि इंटरनेट सेवाच नाही तर एसएमएसच्या सेवेवरही रोमिंग शुल्क आकारले जाणार नाही.
भारती एअरटेलचे एमडी आणि सीईओ (भारत आणि दक्षिण आशिया) गोपाल वित्तल यांनी रोमिंग शुल्क रद्द करण्याची घोषणा केली. 1 एप्रिल 2017 पासून एअरटेलच्या ग्राहकांना या सेवेचा लाभ मिळेल.1 एप्रिलपासून देशभरात कुठेही गेल्यास एअरटेलच्या ग्राहकांना रोमिंग शुल्क लागू होणार नाही.