Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअरटेल ग्राहक आहात, मग ही बातमी वाचा... लवकरच तुम्हाला 1GBसाठी मोजावे लागू शकतात 100 रुपये

एअरटेल ग्राहक आहात, मग ही बातमी वाचा... लवकरच तुम्हाला 1GBसाठी मोजावे लागू शकतात 100 रुपये

एअरटेल सध्या 24 दिवसांच्या 199च्या पॅकमध्ये प्रती दिन 1GB डाटा वापरण्यासाठी देत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 03:34 PM2020-08-26T15:34:27+5:302020-08-26T17:45:26+5:30

एअरटेल सध्या 24 दिवसांच्या 199च्या पॅकमध्ये प्रती दिन 1GB डाटा वापरण्यासाठी देत आहे

Airtel Chairman Sunil Mittal Hints at Price Hike, Asks Subscribers ‘To Prepare to Pay a Lot More’: Report | एअरटेल ग्राहक आहात, मग ही बातमी वाचा... लवकरच तुम्हाला 1GBसाठी मोजावे लागू शकतात 100 रुपये

एअरटेल ग्राहक आहात, मग ही बातमी वाचा... लवकरच तुम्हाला 1GBसाठी मोजावे लागू शकतात 100 रुपये

भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी ग्राहकांना आता अतिरिक्त भार सहन करावा लागेल, असे संकेत दिले आहेत. अतिरिक्त पैसे भरण्यासाठी तयार राहा, असे संकेत मित्तल यांनी एका कार्यक्रमात दिले. त्यांनी सांगितले की, आता 160 रुपयांत 16 GB डाटा ग्राहकांना मिळत होता, परंतु यापुढे फक्त 1.6 GBच मिळणार आहे. याचा अर्थ ग्राहकांना आता 1GBसाठी 100 रुपये मोजावे लागतील.

''तुम्ही महिन्याला 1.6GB वापरा किंवा अधिक रक्कम भरण्यास तयार राहा,''असे मित्तल यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते, अशी माहिती PTIने दिली.''अमेरिका किंवा युरोप प्रमाणे आम्हाला महिन्याला 3700-4400 रुपये नकोत, परंतु महिन्याला 160 रुपयांत 16GBहे नक्कीच परवडणारे नाही,''असेही त्यांनी स्पष्ट केलं.

PTIनुसार मित्तल यांनी सांगितले की, 160 रुपयांत 16GB बिझनेसला फटका देण्यासारखं आहे. या किंमतीत ग्राहकांना 1.6 GB देऊ शकतो. यानुसार ग्राहकांनी प्रती GBसाठी 100 रुपये मोजण्याची तयारी ठेवावी, अशी मित्तल यांना अपेक्षा आहे. एअरटेल सध्या 24 दिवसांच्या 199च्या पॅकमध्ये प्रती दिन 1GB डाटा वापरण्यासाठी देत आहे. भविष्यात याच किंमतीत एअरटेल 2.4 GB डाटा 24 दिवसांसाठी देण्याच्या तयारीत आहेत.

या बिझनेसमध्ये टिकून राहायचे असेल तर एका ग्राहकाकडून महिन्याला 300 रुपये येणं गरजेचं आहे आणि भारती एअरटेल चेअरमन यांनी पुढील सहा महिन्यांत एका ग्राहकाकडून 200 रुपयांचं लक्ष्य ठेवले आहे. ''एका ग्राहकाकडून 300 रुपये येणं गरजेचं आहे, पण सध्या आम्ही 100 रुपये कमीच कमावत आहोत. त्यामुळे टीव्ही, चित्रपट, मनोरंजन आदी व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी डाटाचा वापर अधिक होत असेल, तर त्यासाठी पैसे मोजण्याची तयारी ठेवायला हवी,''असे मित्तल यांनी सांगितले. भारती इंटरप्राईसचे मुख्य कार्यकारी अखिल गुप्ता यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : भारतीय खेळाडूनं केली पत्नी व आईची हत्या; मुलांना फोन करून सांगितली घटना

जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!  

इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!

जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा 'मोठा' वाटा; जाणून घ्या कसा!

Web Title: Airtel Chairman Sunil Mittal Hints at Price Hike, Asks Subscribers ‘To Prepare to Pay a Lot More’: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.