Sunil Bharti Mittal : देशात झपाट्याने डिजिटल क्रांतीचा प्रसार होत आहे. मेट्रो शहरापासून गावखेड्यापर्यंत सर्व आर्थिक व्यवहार आता हातातील मोबाईलवरुन होत आहे. मात्र, यासोबत सायबर गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सायबर क्रिमिनल रोज नवनवीन कट रचून लोकांची कष्टाची कमाई हडप करत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाच हे लक्ष्य करत आहेत. कोरोना काळात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पुनावाला यांचा फोटो वापरुन व्हॉट्सअॅपद्वारे तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा घातला होता. आता तर सायबर गुन्हेगारांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन मोठ्या उद्योगपतीला टार्गेट केल्याने उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. आजकाल आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्थिक घोटाळ्यांच्या अनेक बातम्या ऐकत आहोत. सर्वसामान्यांनाच नव्हे तर सेलिब्रिटी आणि बड्या उद्योगपतींनाही अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांच्यासोबत ही घटना घडली आहे. सुनील मित्तल यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करुन मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न झाला.
सुनीलने मित्तल यांच्या आवाजाचं क्लोनसुनील मित्तल यांनी ही घटना एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये शेअर केली होती. त्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करण्यात आली होती. म्हणजेच क्लोन करण्यात आला होता. त्यांच्या कंपनीच्या दुबईतील एका अधिकाऱ्याला मित्तल यांच्या नावाचा बनावट फोन आला. या कॉलमध्ये त्यांच्या नावावरील खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले होते. कॉलवर सुनील मित्तल यांचा आवाज ऐकून अधिकाऱ्याला धक्काच बसला. कारण ते (सुनील मित्तल) आपल्या अधिकाऱ्यांना अशा सूचना कधीच देत नाहीत. शंका आल्याने अधिकाऱ्याने रक्कम हस्तांतरित केली नाही. त्यामुळे मोठा स्कॅम रोखण्यात यश आलं.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापरसुनील मित्तल म्हणाले की त्यांचा आवाज क्लोन करण्यासाठी अत्यंत प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यात आली होती. गुन्हेगारांनी सुनील मित्तल यांच्या आवाजाचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. एअरटेलच्या अधिकाऱ्याने कॉल बनावट असल्याचे ओळखल्याने मोठा धोका टळला. सुनील मित्तल यांनी असेही सांगितले की ते रेकॉर्डिंग ऐकून मला आश्चर्य वाटले. त्यांनी एआयच्या अशा गैरवापराच्या बातम्या ऐकल्या होत्या. मात्र, त्यांच्यासोबतच असा प्रकार घडू शकतो, याची कल्पनाही केली नव्हती.
एआयचा गैरवापर धोक्याचा ठरू शकतो : सुनील मित्तलआपल्या आवाजाचे क्लोनिंग करुन आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न पाहून सुनील मित्तल यांना धक्का बसला. भविष्यात एआयचा गैरवापर धोकादायक ठरू शकतो, असंही ते म्हणाले. जेव्हा देशातील बड्या टेलिकॉम कंपनीच्या मालकासोबत असा प्रकार घडू शकतो. तर सर्वसामान्यांबद्दल तर बोलायलाच नको.