नवी दिल्ली: आताच्या घडीला टेलिकॉम क्षेत्रात तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे. टेलिकॉम कंपन्या ग्राहक टिकवण्यासाठी आकर्षक प्लान्स आणत आहेत. याशिवाय कमी किमतीत जास्त बेनिफिट्स ऑफर करत असल्यामुळे युजर्सना मोठा फायदा होत आहे. यातच आता Airtel ने दमदार प्लान आणले आहेत. १९ रुपयांपासून सुरू होत असलेल्या प्लानमध्ये डेटा, कॉलिंग यासह उत्तम बेनिफिट्स मिळतील, असे सांगितले जात आहे.
Airtel कडे १९ रुपयांचा सर्वांत स्वस्त ४जी डेटा वाउटर आहे. १९ रुपयांच्या व्हाऊचरमध्ये कंपनी १ जीबी डेटा ऑफर करत आहे. या व्हाऊचरची वैधता केवळ १ दिवस आहे. केवळ १ दिवसासाठी इंटरनेट हवे असल्यास हे व्हाऊचर उपयुक्त ठरू शकते. तसेच, एअरटेलचे ५८ रुपयांच्या किंमतीत येणारा ४जी डेटा व्हाऊचर उपलब्ध आहे. या व्हाऊचरमध्ये एकूण ३ जीबी डेटा मिळेल.
९८ रुपयांच्या डेटा वाउचरमध्ये तुम्हाला ५जी डेटा
Airtel च्या ९८ रुपयांच्या डेटा वाउचरमध्ये तुम्हाला ५जी डेटा दिला जाईल. या व्हाऊचरची वैधता तुमच्या सध्याच्या अॅक्टिव्ह प्लान एवढी असेल. यात विंक म्यूझिक प्रीमियमचे मोफत मेंबरशिप देखील मिळेल. कंपनीच्य १०८ रुपयांच्या डेटा व्हाऊचरमध्ये ६ जीबी डेटा मिळेल. याची वैधता देखील अॅक्टिव्ह प्लान एवढी असेल. यामध्ये विंक म्यूझिक, फ्री हेलोट्यून्स आणि ३० दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
१२ जीबी डेटासाठी ११८ रुपयांचा प्लान
Airtel चा ११८ रुपयांच्या प्लानमध्ये १२ जीबी डेटा दिला जात आहे. यात कोणतेही अतिरिक्त बेनिफिट्स मिळत नाहीत. याची वैधता देखील अॅक्टिव्ह प्लान एवढी असेल, असे सांगितले जात आहे.