Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअरटेलने फटका बसण्यापूर्वीच आपली चूक सुधारली! दोन मोठे प्लॅन ११० रुपयांपर्यंत स्वस्त केले

एअरटेलने फटका बसण्यापूर्वीच आपली चूक सुधारली! दोन मोठे प्लॅन ११० रुपयांपर्यंत स्वस्त केले

एअरटेलने आपल्या प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 14:52 IST2025-01-26T14:50:05+5:302025-01-26T14:52:38+5:30

एअरटेलने आपल्या प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे.

Airtel corrected its mistake before it got hit! Two major plans reduced by up to Rs 110 | एअरटेलने फटका बसण्यापूर्वीच आपली चूक सुधारली! दोन मोठे प्लॅन ११० रुपयांपर्यंत स्वस्त केले

एअरटेलने फटका बसण्यापूर्वीच आपली चूक सुधारली! दोन मोठे प्लॅन ११० रुपयांपर्यंत स्वस्त केले

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्वपूर्ण बदलल केला आहे. एअरटेलने आपल्या काही प्लॅनमध्ये ११० रुपये कमी केले आहेत.काही दिवसापूर्वी ट्राय ने सर्वच टेलिकॉम कंपन्यांना नोटीस दिली होती. यामध्ये त्यांनी नवीन व्हॉईस आणि एसएमएस प्लॅन लाँच करण्यासा सांगितले होते. मात्र, कंपन्यांनी प्लॅन लाँच केले पण किंमती कमी केल्या नाहीत. दरम्यान, आता ट्रायने यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे एअरटेनले कारवाई आधीच आपले प्लॅन बदलले आहेत, यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

AI ठरवणार भारताचं भविष्य? जगभरातील कंपन्या करतायेत कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक; नोकऱ्यांचं काय होणार?

ज्या किमतीत डेटा असलेले प्लॅन उपलब्ध होते त्याच किमतीत कंपन्यांनी फक्त कॉलिंग आणि एसएमएस असलेले प्लॅन लाँच केले आहेत. यानंतर ट्रायने सर्वच प्लॅनची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. पूर्वी एअरटेलच्या या प्लॅनची ​​किंमत ४९९ आणि १९५९ रुपये होती, पण आता किमतीत कपात केल्यानंतर या प्लॅनच्या नवीन किमती ४६९ आणि १८४९ रुपये करण्यात आल्या आहेत. 

४६९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा ४६९ रुपयांचा प्लॅन प्रसिद्ध आहे.या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड मोफत कॉलिंग आणि ९०० एसएमएस मिळतात. तुम्हाला हा प्लॅन ८४ दिवसांच्या वैधतेसह मिळेल. हा प्लॅन पूर्वीच्या तुलनेत ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे, यामुळे आता ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे.

१८४९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा १८४९ रुपयांचा प्लॅन ३६५ दिवसांच्या वैधतेसह येईल, याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि ३६०० एसएमएसची सुविधा मिळते. दोन्ही प्लॅनसह तुम्हाला अपोलो २४/७ सर्कल मेंबरशिप आणि तीन महिन्यांसाठी मोफत हॅलोट्यून मिळेल. या प्लॅनची ​​किंमत पूर्वीच्या तुलनेत ११० रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

एअरटेलने ग्राहकांना दिलासा दिला आहे. याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. ट्रायने एअरटेल आणि जिओने सुरू केलेल्या नवीन प्लॅनची ​​चौकशी करण्याचे सांगितले होते. दरम्यान, आता एअरटेलने प्लॅनचे दर कमी केले आहेत. ट्रायच्या या निर्णयामुळे ग्राहकांचा फायदा झाला आहे. दरम्यान, आता जिओही यावर निर्णय घेईल असा अंदाज आहे.

Web Title: Airtel corrected its mistake before it got hit! Two major plans reduced by up to Rs 110

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.