देशातील मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने म्युझिक इंडस्ट्रीला बायबाय केले आहे. विंक म्युझिक अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात अनेक कंपन्य़ांची अॅप आहेत. यामुळे विंक म्युझिक तोट्यात असून कंपनीने ही कंपनी बंद करम्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे भारती एअरटेल म्युझिक क्षेत्रातून बाहेर पडणार आहे. हे अॅप बंद झाल्याने अनेकांना त्याचा फटका बसणार आहे. मुख्य फटका कर्मचाऱ्यांना बसण्याचे सांगितले जात होते, परंतू या कर्मचाऱ्यांना एअरटेल कंपनीच्या अन्य कामांमध्ये वळते केले जाणार असल्याचे प्रवक्त्याने सांगितले आहे.
विंक म्युझिक अॅप कंपनी येत्या काही महिन्यांत बंद करणार आहे. विंक बंद केले जाणार असले तरी एअरटेल युजर्सना अॅपल म्युझिकचा अॅक्सेस दिला जाणार आहे. विंक म्युझिकचे सबस्क्रीप्शन घेतलेल्या ग्राहकांना एअरटेल फॉर अॅपलची सेवा दिली जाणार आहे. यासाठी एअरटेलने अॅपलशी कराराची तयारी केली आहे. आयफोन वापरणाऱ्या एअरटेलच्या युजर्सना त्याचा फायदा होणार आहे.