Join us

Airtel नं आपल्या कॉलिंग, SMS च्या रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल, काय असेल नवी किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:08 IST

Airtel Tariff: ट्रायच्या आदेशानंतर एअरटेलनं नवे प्लान्स लाँच केले होते. पण त्या प्लानच्या किंमतीबाबत एअरटेलनं आता मोठा निर्णय घेतला आहे.

Airtel Tariff: काही दिवसांपूर्वी ट्रायनं सर्व टेलिकॉम कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन देण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून डेटा न वापरणाऱ्या युजर्सना फायदा होऊ शकेल. ट्रायच्या या आदेशानंतर एअरटेल, जिओ आणि व्हीआयनं आपल्या युजर्ससाठी कॉलिंग आणि एसएमएससह रिचार्ज प्लान्स आणले. एअरटेलनं आपल्या युजर्ससाठी दोन नवे रिचार्ज प्लान्स आणले होते पण आता एअरटेलने या प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत.

एअरटेलनं नुकतेच केवळ कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. यात एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या आणि १९५९ रुपयांच्या प्लानचा समावेश होता. आता एअरटेलने या रिचार्ज प्लानमध्ये बदल केलेत.

४६९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलनं आपल्या ४९९ रुपयांच्या प्लानची किंमत आता ४६९ रुपये केली आहे. एअरटेलने या प्लानमध्ये ३० रुपयांची कपात केलीये. या प्लानमध्ये युजर्संना ८४ दिवसांच्या वैधतेसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. या प्लानमध्ये युजरला डेटाचा फायदा मिळत नाही.

१८४९ रुपयांचा प्लान

एअरटेलनं आपल्या १९५९ रुपयांच्या प्लानची किंमत आता १८४९ रुपये केली आहे. एअरटेलनं या प्लानमध्ये ११० रुपयांची कपात केलीये. या प्लानमध्ये युजर्सला ३६५ दिवसांच्या वैधतेसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच ३६०० फ्री एसएमएसही मिळतात. या प्लानमध्ये युजरला डेटाचा फायदा मिळत नाही.

टॅग्स :एअरटेलरिलायन्स जिओव्होडाफोन आयडिया (व्ही)