Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअरटेल, आयडियाची टीडीसॅटकडे धाव

एअरटेल, आयडियाची टीडीसॅटकडे धाव

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हव्या तितक्या योजना राबविण्याची परवानगी ट्रायने दूससंचार कंपन्यांना दिल्याच्या विरोधात एअरटेल व आयडिया यांनी टेलिकॉम डिस्प्युट्स सेटलमेंट अँड अ‍ॅपिलेट ट्रायब्युनलकडे (टीडीसॅट) दाद मागितली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:09 AM2018-03-06T01:09:00+5:302018-03-06T01:09:00+5:30

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हव्या तितक्या योजना राबविण्याची परवानगी ट्रायने दूससंचार कंपन्यांना दिल्याच्या विरोधात एअरटेल व आयडिया यांनी टेलिकॉम डिस्प्युट्स सेटलमेंट अँड अ‍ॅपिलेट ट्रायब्युनलकडे (टीडीसॅट) दाद मागितली आहे.

 Airtel, Idea's TDSAT has been running | एअरटेल, आयडियाची टीडीसॅटकडे धाव

एअरटेल, आयडियाची टीडीसॅटकडे धाव

- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हव्या तितक्या योजना राबविण्याची परवानगी ट्रायने दूससंचार कंपन्यांना दिल्याच्या विरोधात एअरटेल व आयडिया यांनी टेलिकॉम डिस्प्युट्स सेटलमेंट अँड अ‍ॅपिलेट ट्रायब्युनलकडे (टीडीसॅट) दाद मागितली आहे.
या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्या व ग्राहक या दोघांच्याही हिताला बाधा येऊ शकते. याचा फक्त जिओ या कंपनीलाच फायदा होणार आहे, असा या कंपन्यांचा दावा आहे. ट्रायचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी या कंपन्यांची मागणी अद्याप तरी टीडीसॅटने मान्य केलेली नाही. ट्रायने ४ आठवड्यांच्या आत उत्तर सादर करावे, असा आदेश टीडीसॅटने दिला आहे. ट्रायच्या उत्तरावर
३ आठवड्यांच्या आत एअरटेल व आयडिया या २ कंपन्यांनी आपली बाजू मांडावयाची आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे.

Web Title:  Airtel, Idea's TDSAT has been running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.