Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स

Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स

Bharti Airtel Insurance : तुम्हाला एअरटेलच्या रिचार्ज प्लॅन्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का, ज्यामध्ये लोकांना मोफत विमादेखील दिला जातो. पाहूया कोणते आहेत हे प्लॅन्स.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 02:10 PM2024-10-24T14:10:45+5:302024-10-24T14:10:45+5:30

Bharti Airtel Insurance : तुम्हाला एअरटेलच्या रिचार्ज प्लॅन्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का, ज्यामध्ये लोकांना मोफत विमादेखील दिला जातो. पाहूया कोणते आहेत हे प्लॅन्स.

Airtel is offering free accidental insurance of up to 5 lakhs with these 3 plans See details | Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स

Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स

Bharti Airtel Insurance : भारती एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. सुमारे ३९ कोटी लोक एअरटेलशी जोडलेले आहेत. तुम्हाला एअरटेलच्या रिचार्ज प्लॅन्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का, ज्यामध्ये लोकांना मोफत विमादेखील दिला जातो. एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी काही स्कीम्स देखील आणल्या आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना ५ लाखापर्यंतचा मोफत विमा मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच ३ प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.

एअरटेलनं आपल्या ग्राहकांना विमा सुविधा देण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डसोबत भागीदारी केली आहे. याद्वारे ग्राहकांना रिचार्ज प्लॅनसोबत मोफत विम्याची सुविधा मिळते.

एअरटेलचा २३९ रुपयांचा प्लान

एअरटेल आपल्या २३९ रुपयांच्या प्लानमध्ये फ्री अॅक्सिडेंटल इन्शुरन्स देत आहे. या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांच्या वैधतेसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज २ जीबी डेटा दिला जातो. तसंच दररोज १०० फ्री एसएमएसची सुविधाही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. या प्लानमध्ये युजरला अॅक्सिडेंटल इन्शुरन्स अंतर्गत १ लाख रुपये आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यास २५,००० रुपये दिले जातात. हा अपघाती विमा ३० दिवसांसाठी वैध आहे.

एअरटेलचा ३९९ रुपयांचा प्लान

एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये २३९ रुपयांच्या प्लॅनचे सर्व फायदे मिळतात. या प्लानमध्ये ग्राहकांना अपघाती विम्यासह संपूर्ण ३० दिवसांची वैधता दिली जाते.

एअरटेलचा ९६९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या ९६९ रुपयांच्या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० फ्री एसएमएस आणि रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या योजनेत १८ ते ३० वयोगटातील व्यक्तींना मोफत अपघाती विमा दिला जातो. हा प्लॅन खरेदी करून तुम्ही ५ लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा मिळवू शकता.

Web Title: Airtel is offering free accidental insurance of up to 5 lakhs with these 3 plans See details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल