Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

Netflix Plans : रिलायन्स जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे प्रीपेड ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स प्लॅन्स उपलब्ध आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 01:16 PM2024-10-11T13:16:00+5:302024-10-11T13:16:38+5:30

Netflix Plans : रिलायन्स जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे प्रीपेड ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स प्लॅन्स उपलब्ध आहेत.

Airtel, Jio or Vi, which company has the cheapest Netflix plan? | Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

Netflix Plans : भारतातील अमॅझोन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) आणि डिस्ने प्लॅस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) च्या तुलनेत नेटफ्लिक्सचे (Netflix) प्लॅन्स थोडे महाग आहेत. त्यामुळं बहुतेक लोक अशा रिचार्ज प्लॅन्स शोधत असतात. ज्याद्वारे त्यांना मोफत नेटफ्लिक्स (Free Netflix) अॅक्सेस मिळू शकेल. 

रिलायन्स जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे प्रीपेड ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स प्लॅन्स उपलब्ध आहेत. अर्थात, रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या तिन्ही कंपन्या नेटफ्लिक्ससह प्लॅन ऑफर करत आहेत. नेटफ्लिक्ससोबत कोणत्या टेलिकॉम कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन मिळेल? यासंदर्भात जाणून घ्या..

Jio Netflix Plans
रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त नेटफ्लिक्स १२९९ रुपयांचा प्लॅन आहे.  जिओ १२९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि मोफत कॉलिंगसह ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. दरम्यान, या प्लॅनसह तुम्हाला नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅनमध्ये मोफत अॅक्सेस दिला जाईल.

Vi Free Netflix Plan
आयडिया-व्होडाफोनकडे सर्वात स्वस्त प्लॅन नेटफ्लिक्स प्लॅन आहे, या प्लॅनची किंमत ११९८ रुपये आहे. आयडिया-व्होडाफोनच्या ११९८ प्लॅनसोबत कंपनी दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ७० दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. एक्स्ट्रा बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅनसोबत बिंज ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर (सोमवार ते शुक्रवार दरम्यान शिल्लक असलेला दैनंदिन डेटा तुम्ही वीकेंड दरम्यान वापरू शकता), डेटा डिलाईट आणि नेटफ्लिक्स (टीव्ही आणि मोबाइल) चे फ्री अॅक्सेस दिले जाते. या प्लॅनमध्ये फ्री नेटफ्लिक्स बेसिस सबस्क्रिप्शन (Netflix Basic Subscription) ७० दिवसांसाठी मिळते.

Airtel Netflix Plans
एअरटेलकडे नेटफ्लिक्स प्लॅन आहे, पण एअरटेलचा प्लॅन जिओ आणि आयडिया-व्होडाफोनपेक्षा जास्त महाग आहे. एअरटेल १९९८ प्लॅनमध्ये मोफत नेटफ्लिक्स बेसिक, दररोज ३ जीबी डेटा, मोफत कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, एअरटेल एक्स्ट्रीम, अपोलो २४/७ सर्कल मेंबरशिप आणि फ्री हॅलो ट्यूनमध्ये प्रवेश उपलब्ध आहे.
 

Web Title: Airtel, Jio or Vi, which company has the cheapest Netflix plan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.