Join us  

Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 4:01 PM

Airtel New Recharge Plans: जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या पुन्हा एखदा युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. जर तुम्ही एअरटेल युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

Airtel New Recharge Plans: जुलै महिन्यात खासगी टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत लक्षणीय वाढ करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या पुन्हा एखदा युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. जर तुम्ही एअरटेल युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. एअरटेलनं तीन नवे प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. जाणून घेऊया रिचार्ज प्लॅन्सबद्दल अधिक माहिती.

एअरटेलचा १६१ रुपयांचा रिचार्ज प्लान

एअरटेलचा १६१ रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन एक प्रीपेड प्लॅन आहे, जो तुम्हाला पूर्ण ३० दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असेल. या प्लानमध्ये युजर्सना ३० दिवसांसाठी १२ जीबी डेटा दिला जातो. ज्या युजर्सना अधिक डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट आहे.

एअरटेलचा १८१ रुपयांचा रिचार्ज प्लान

एअरटेलचा १८१ रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन एक प्रीपेड प्लॅन आहे, जो तुम्हाला पूर्ण ३० दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असेल. या प्लानमध्ये युजर्सना ३० दिवसांसाठी १५ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला २० पेक्षा जास्त ओटीटीचा ही फायदा मिळतो. यात ३० दिवसांसाठी एअरटेल एक्सट्रीम प्ले सेवेचाही समावेश आहे.

एअरटेलचा ३६१ रुपयांचा रिचार्ज प्लान

एअरटेलचा ३६१ रुपयांचा प्लॅन देखील प्रीपेड प्लॅन आहे. ज्यात तुम्हाला ५० जीबी डेटा दिला जातो. वास्तविक, युजर्सकडे आधीपासूनच अॅक्टिव्ह रिचार्ज प्लॅन असेल तरच ते या प्लॅनचा वापर करू शकतील. अॅक्टिव्ह प्लानची वैधता ३६१ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनइतकीच असेल.

टॅग्स :एअरटेल