Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता Airtel ही स्पर्धेत! Jio नंतर सादर केले ३० दिवसांचे प्लान; पाहा, डिटेल्स आणि दर

आता Airtel ही स्पर्धेत! Jio नंतर सादर केले ३० दिवसांचे प्लान; पाहा, डिटेल्स आणि दर

एअरटेलने सादर केलेले नवीन प्लान्स ट्रायच्या निर्देशानुसार असल्याची माहिती मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:46 AM2022-04-02T11:46:27+5:302022-04-02T11:47:05+5:30

एअरटेलने सादर केलेले नवीन प्लान्स ट्रायच्या निर्देशानुसार असल्याची माहिती मिळाली आहे.

airtel launched recharge plans with thirty days validity as per trai know about benefits with details | आता Airtel ही स्पर्धेत! Jio नंतर सादर केले ३० दिवसांचे प्लान; पाहा, डिटेल्स आणि दर

आता Airtel ही स्पर्धेत! Jio नंतर सादर केले ३० दिवसांचे प्लान; पाहा, डिटेल्स आणि दर

नवी दिल्ली: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने काही महिन्यांपूर्वी टेलिकॉम कंपन्यांना ३० दिवसांच्या वैधतेसह किमान एक प्लान करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रथम जिओ आणि त्यानंतर आता Airtel ने स्पर्धेत उडी घेतली आहे. एअरटेलने ३० दिवसांच्या वैधतेचे प्लान सादर केले आहेत. यामुळे कंपनीचा पोर्टफोलियो वाढल्याचे सांगितले जात आहे. याचा ग्राहकांना चांगला फायदा मिळू शकेल, असेही म्हटले जात आहे. 

Airtel च्या वेबसाइटवर लिस्ट २९६ आणि ३१९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज उपलब्ध आहेत. अधिकृत सूचीनुसार, २९६ रुपयांच्या एअरटेल प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० SMS आणि एकूण २५ GB डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. एअरटेलने सादर केलेले नवीन प्लान्स जानेवारीत पास झालेल्या ट्रायच्या निर्देशानुसार असल्याची माहिती मिळाली आहे. 

Airtel च्या ३१९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलच्या ३१९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ GB हाय-स्पीड डेटा मिळेल. हा प्लान पूर्ण महिन्याच्या वैधतेसह येते. या दोन्ही Airtel प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये Amazon Prime Video Mobile Edition चे ३० दिवसांचे मोफत ट्रायल, तीन महिन्यांसाठी Apollo 24 x 7 सर्कल आणि FASTag वर १०० रुपयांच्या कॅशबॅक यासह अतिरिक्त फायदे आहेत. या योजना विंक म्युझिकच्या विनामूल्य प्रवेशासह देखील येतात. 

दरम्यान, Reliance Jio ने 'कॅलेंडर महिन्याच्या वैधते'सह २५९ रुपयांचा चा प्रीपेड रिचार्ज प्लान सादर केला. जो Airtel च्या ३१९ रुपयांच्या उपलब्ध असलेल्या एका महिन्याच्या वैधतेप्रमाणे आहे. २५९ रुपयांच्या Jio प्लानमध्ये दररोज १.५ GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध होते. हे Jio Apps च्या मोफत सबस्क्रिप्शनसह देखील येते.
 

Web Title: airtel launched recharge plans with thirty days validity as per trai know about benefits with details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल