Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त 119 रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन मोफत; Airtel चा नवीन रिचार्ज प्लॅन सादर  

फक्त 119 रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन मोफत; Airtel चा नवीन रिचार्ज प्लॅन सादर  

Airtel 119 recharge: एयरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन डेटा अ‍ॅड-ऑन पॅक सादर केला आहे. या डेटा पॅकमध्ये ग्राहकांना एकूण 15GB डेटा मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 04:43 PM2021-09-10T16:43:29+5:302021-09-10T16:49:02+5:30

Airtel 119 recharge: एयरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन डेटा अ‍ॅड-ऑन पॅक सादर केला आहे. या डेटा पॅकमध्ये ग्राहकांना एकूण 15GB डेटा मिळेल.

Airtel launches 119 rupees data pack offering 15gb data ott subscription  | फक्त 119 रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन मोफत; Airtel चा नवीन रिचार्ज प्लॅन सादर  

फक्त 119 रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन मोफत; Airtel चा नवीन रिचार्ज प्लॅन सादर  

Airtel ने एक नवीन डेटा प्लॅन आपल्या युजर्ससाठी नवीन प्लॅन सादर केला आहे. Xstream Mobile Pack नाव असलेल्या या प्लॅनची किंमत 119 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना डेटा व्यतिरिक्त युजर्सना 30 दिवसांसाठी एयरटेल एक्सट्रीम अ‍ॅपवरील एका ओटीटी चॅनेलचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. एयरटेल युजर्स हा डेटा-पॅक Airtel Thanks अ‍ॅपवर जाऊन अ‍ॅक्टिव्हेट करू शकतात.  

Airtel 119 Plan 

एयरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन डेटा अ‍ॅड-ऑन पॅक सादर केला आहे. या डेटा पॅकमध्ये ग्राहकांना एकूण 15GB डेटा मिळेल. हा एक अ‍ॅड-पॅक असल्यामुळे तुमच्या चालू प्लॅनच्या वैधतेपर्यंत हा प्लॅन वापरता येईल. हा रिचार्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही माध्यमातून अ‍ॅक्टिव्हेट करता येईल. रिचार्ज केल्यानंतर त्वरित तुमच्या अकॉउंटमध्ये 15जीबी डेटा क्रेडिट केला जाईल. 

डेटा क्रेडिट झाल्यानंतर युजर्स 30 दिवसांच्या आत इरोज नाऊ (हिंदी), मनोरमा मॅक्स (मल्याळम) किंवा Hoichoi (बंगाली) यापैकी एक एक ओटीटी चॅनेल निवडू शकतात. त्यांनतर ते ओटीटी चॅनेल अँड्रॉइड आणि iOS डिवाइसेजवर एयरटेल एक्सट्रीम अ‍ॅपमध्ये जाऊन सबस्क्राईब करावे लागेल. या प्लॅनची वैधता आणि ओटीटी अ‍ॅपच्या वैधता वेगवेगळी असेल. ओटीटी अ‍ॅपची 30 दिवसांची वैधता ज्या दिवशी सब्सक्रिप्शन घेतले जाईल तेव्हापासून ग्राह्य धरली जाईल.  

Web Title: Airtel launches 119 rupees data pack offering 15gb data ott subscription 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल