भारतात 5G नेटवर्कबाबत काम सुरू करण्यात आलं आहे. सरकारनं 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केला नसला तरी दूरसंचार विभागानं नुकतेच भारती एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडियाला 5G चाचणीसाठी परवानगी दिली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार 3.5 GHz बँडवर चालणाऱ्या Airtel 5G नेटवर्कची गुरुग्रामध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे. तसंच एका व्हिडीओमध्ये त्याचा 5G स्पीडही दाखवण्यात आला आहे.
एअरटेलनं दिलेल्या माहितीनुसार गुरुग्राममधील सायबर हब या परिसरात Airtel 5G ट्रायल नेटवर्क लाईव्ह करण्यात आलं आहे. 91 मोबाईल्सच्या माहितीनुसार हे नेटवर्क 3,500MHz बँडवर ऑपरेट केलं जात आहे. तसंच यात अतिशय चांगला डाऊनलोड स्पीडही मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये 1GBPS पेक्षा अधिक स्पीड मिळत आहे.एका युझरनं यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये Airtel 5G मध्ये मिळणारा स्पीड दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे Airtel 5G मध्ये सध्या चाचणीदरम्यान स्पीड हा 1GBPS पेक्षा अधिक मिळत आहे. तर अपलोडींग स्पीडही उत्तम मिळत आहे.
एरिक्सन इन्फ्रावर चाचणीईटी टेलिकॉमनं दिलेल्या माहितीनुसार Airtel 5G नेटवर्क एरिक्सन इन्फ्रास्ट्रक्चरवर सुरू आहे. येत्या काही महिन्यात अन्य ठिकाणीही एअरटेलच्या 5G नेटवर्कची चाचणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशात 5G नेटवर्क केव्हा लाँच होईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.