Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअरटेल रिचार्ज पुन्हा महागणार? कंपनीच्या एमडीनेच दिले संकेत; तुमच्या खिशावर किती भार पडणार?

एअरटेल रिचार्ज पुन्हा महागणार? कंपनीच्या एमडीनेच दिले संकेत; तुमच्या खिशावर किती भार पडणार?

Airtel MD: तुम्ही जर एअरटेल कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण, आता रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:10 IST2025-02-09T16:09:13+5:302025-02-09T16:10:26+5:30

Airtel MD: तुम्ही जर एअरटेल कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण, आता रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

airtel md gopal vittal said mobile tariff rise is necessary for financial stability of sector | एअरटेल रिचार्ज पुन्हा महागणार? कंपनीच्या एमडीनेच दिले संकेत; तुमच्या खिशावर किती भार पडणार?

एअरटेल रिचार्ज पुन्हा महागणार? कंपनीच्या एमडीनेच दिले संकेत; तुमच्या खिशावर किती भार पडणार?

Airtel Recharge Plan : तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली नाही. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने मोबाईल रिचार्जमध्ये वाढ केली होती. त्यानंतर कंपनीला विक्रमी नफा झाला. अशा परिस्थितीत भारती एअरटेलने पुन्हा एकदा दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. दूरसंचार क्षेत्राची आर्थिक स्थिरता राखण्यासाठी दरात आणखी वाढ करणे आवश्यक असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी म्हटले आहे.

भारती एअरटेलचे डिसेंबर २०२४ चे तिमाही निकाल नुकतेच समोर आले. यामध्ये कंपनीचा प्रति ग्राहक महसूल चांगलाच वाढला आहे. यावेळी गोपाल विट्टल म्हणाले की कंपनी सध्या नेटवर्कमधील गुंतवणूक कमी करत आहे. परंतु, ट्रान्समिशन पॉवर वाढवणे, ग्राहकांचा अनुभव सुधारणे आणि होम ब्रॉडबँड सेवांचा विस्तार करणे यावर लक्ष केंद्रित करेल. या आर्थिक वर्षात कंपनीचा भांडवली खर्च (Capex) गेल्या वर्षीपेक्षा कमी असेल हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

होलसेल व्हॉईस आणि मेसेजिंग बंद करणार?
 कंपनीने त्यांच्या जागतिक व्यवसाय पोर्टफोलिओमधून होलसेल व्हॉईस आणि मेसेजिंग व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या व्यवसायातून खूपच कमी नफा मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी आता डिजिटल क्षमता मजबूत करण्यासाठी नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे विट्टल यांनी सांगितले.

भारतात मोबाईल रिचार्ज सर्वात स्वस्त
रिचार्ज वाढवण्याचे संकेत देताना एमडी विट्टल यांनी जगाच्या तुलनेत भारतात रिचार्ज सर्वात स्वस्त असल्याचे सांगितले. अशा स्थितीत उद्योगाची आर्थिक स्थिती राखण्यासाठी त्यात आणखी वाढ करण्याची गरज आहे. दूरसंचार क्षेत्रात टिकण्यासाठी टेरिफमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. इतर खाजगी दूरसंचार कंपन्यांनी गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये त्यांच्या दरांमध्ये १०-२१% वाढ केली होती. एअरटेल येत्या काही महिन्यांत रिचार्ज प्लॅनच्या किमती आणखी वाढवू शकते.

कंपनीच्या नफ्यात भगघोस वाढ
भारती एअरटेलने गुरुवारी आपला त्रैमासिक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ५ पटीने वाढून १६,१३४.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही वाढ प्रामुख्याने इंडस टॉवर्सच्या व्यवसायाच्या विलीनीकरणामुळे आणि दरवाढीचा फायदा झाल्यामुळे झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा २,८७६.४ कोटी रुपये होता. भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या दूरसंचार कंपनीने या तिमाहीत४५,१२९.३ कोटी कमाई नोंदवली. जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील जवळपास १९% अधिक आहे.

Web Title: airtel md gopal vittal said mobile tariff rise is necessary for financial stability of sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.