Lokmat Money > बिझनेस न्यूज > 5G सेवा देण्यासाठी एअरटेल-नोकिया आले एकत्र

5G सेवा देण्यासाठी एअरटेल-नोकिया आले एकत्र

मोबाईल निर्माती कंपनी नोकिया आणि भारतातील अग्रगण्य टेलीकॉम कंपनी एअरटेल यांनी 5G सेवा देण्यासाठी एकत्र

By admin | Published: March 2, 2017 03:08 PM2017-03-02T15:08:55+5:302017-03-02T15:08:55+5:30

मोबाईल निर्माती कंपनी नोकिया आणि भारतातील अग्रगण्य टेलीकॉम कंपनी एअरटेल यांनी 5G सेवा देण्यासाठी एकत्र

Airtel-Nokia came together to provide 5G services | 5G सेवा देण्यासाठी एअरटेल-नोकिया आले एकत्र

5G सेवा देण्यासाठी एअरटेल-नोकिया आले एकत्र

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - मोबाईल निर्माती कंपनी नोकिया आणि भारतातील अग्रगण्य टेलीकॉम कंपनी एअरटेल यांनी 5G सेवा देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि 5G टेक्नॉलॉजी आणण्यासाठी करार केला आहे. 
 
यावेळी भारती एअरटेलचे संचालक (नेटवर्क सेवा) अभय सावरगावकर  म्हणाले, 5G आणि आयओटी अॅप्लिकेशन तंत्रज्ञानामध्ये जीवन बदलवण्याची क्षमता आहे. नोकियासोबत काम करून भविष्यातील या तंत्रज्ञानाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी करताना आनंद होत आहे असं ते म्हणाले. 
 
5G मुळे हायस्पीड डेटा देता येईल तसेच या सेवेमुळे नवीन ग्राहक जोडण्यास मदत होईल, असं एअरटेलने सांगितलं.
एअरटेलसोबत काम करून 2G, 3G आणि 4G सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यानंतर आता 5G ची घोषणा करणं आमच्यासाठी आनंदाची बाब आहे असं नोकियाचे भारताचे मार्केटिंग हेड संजय मलिक म्हणाले. 

Web Title: Airtel-Nokia came together to provide 5G services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.