ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - मोबाईल निर्माती कंपनी नोकिया आणि भारतातील अग्रगण्य टेलीकॉम कंपनी एअरटेल यांनी 5G सेवा देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि 5G टेक्नॉलॉजी आणण्यासाठी करार केला आहे.
यावेळी भारती एअरटेलचे संचालक (नेटवर्क सेवा) अभय सावरगावकर म्हणाले, 5G आणि आयओटी अॅप्लिकेशन तंत्रज्ञानामध्ये जीवन बदलवण्याची क्षमता आहे. नोकियासोबत काम करून भविष्यातील या तंत्रज्ञानाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी करताना आनंद होत आहे असं ते म्हणाले.
5G मुळे हायस्पीड डेटा देता येईल तसेच या सेवेमुळे नवीन ग्राहक जोडण्यास मदत होईल, असं एअरटेलने सांगितलं.
एअरटेलसोबत काम करून 2G, 3G आणि 4G सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यानंतर आता 5G ची घोषणा करणं आमच्यासाठी आनंदाची बाब आहे असं नोकियाचे भारताचे मार्केटिंग हेड संजय मलिक म्हणाले.