नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात बँकिंग, उद्योग, व्यवसाय, नोकरी यांवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आता एका बँकेने ग्राहकांना दिलासा दिला आहे. या बँकेने आपल्या बचत खात्यावरील ग्राहकांसाठी व्याजदरात वाढ केलीय. बँकेच्या या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदा होईल, असे एअरटेल पेमेंट्स बँकेकडून सांगण्यात आले आहे. (airtel payments bank increased 6 percent interest rate on deposits of over one lakh rupees)
एअरटेल पेमेंट्स बँकेने आपल्या बचत खात्यावरील ग्राहकांसाठी व्याजदरात वाढ केली आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बचत खात्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर वार्षिक 6 टक्के व्याज मिळणार आहे, अशी माहिती एअरटेल पेमेंट्स बँकेकडून देण्यात आली आहे.
संकटात दिलासा! RIL च्या नफ्यात वाढ; २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार बोनस
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार पेमेंट्स बँकेच्या बचत खात्याची दैनंदिन मर्यादा दोन लाख रुपये करण्यात आली आहे. या सूचनांची अंमलबजावणी सर्वप्रथम एअरटेल पेमेंट्स बँकेकडून करण्यात आली आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेचे ५ लाख बँकिंग पॉईंट आहेत. बँक शहरी डिजिटल आणि ग्रामीण दोन्ही अंतर्गत ग्राहकांसाठी बँकिंग सेवा प्रदान करते. त्याचबरोबर एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील वार्षिक व्याज अडीच टक्के आहे.
कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले
एअरटेलचे ५.५ कोटींहून अधिक वापरकर्ते
आताच्या घडीला एअरटेलचे ५.५ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. RBI कडून बचत ठेवीची मर्यादा वाढविणे पेमेंट्स बँकेसाठी एक मोठे पाऊल आहे. आमच्याकडे ५ लाखांहून अधिक बँकिंग पॉईंट्स आणि सुरक्षा डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे वापरकर्ते सुरक्षित पद्धतीने डिजिटल व्यवहार करू शकतात. शहरी डिजिटल आणि ग्रामीण ग्राहकांच्या दृष्टीने एअरटेल पेमेंट्स बँक बाजारपेठेत अग्रणी आहे. एअरटेल थँक्स अॅपवरून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एअरटेल पेमेंट्स बँकेत खाते उघडता येऊ शकते. बँक Rewards123 नावाचे डिजिटल सेव्हिंग खाते ऑफर करते, जे डिजिटल व्यवहार करणार्या ग्राहकांना महत्त्वाची सेवा पुरवते, असे एअरटेल पेमेंट्स बँकेचे सीईओ अनुब्रता बिस्वास यांनी सांगितले.