नवी दिल्ली : एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन-आयडियाने (Vodafone Idea) आपल्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. त्यानंतरही, तिन्ही टेलिकॉम कंपन्यांचे असे प्लॅन्स आहेत, जे खूप लोकप्रिय आहेत. आज आम्ही एअरटेलच्या कमी किमतीच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये अधिक बेनिफिट्स दिले जातात. जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल आणि कमी किमतीत अधिक बेनिफिट्ससह प्लॅन घेऊ इच्छित असाल, तर आम्ही तुमचा गोंधळ दूर करतो. एक नाही तर दोन असे प्लॅन उपलब्ध आहेत, जे युजर्संसाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एकत्रित ओव्हर-द-टॉप (OTT) मेंबरशिपसह येतात.
Airtel चा 599 रुपयांचा प्लॅन
Airtel चा 599 रुपयांचा हा प्लॅन 28 दिवसांच्या अगदी लहान व्हॅलिडिटीसह येतो. जर तुम्ही विचार करत असाल की हा प्लॅन इतका महाग का आहे, तर येथे त्याचे फायदे आहेत. युजर्संना दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 SMS/दिवस आणि 499 रुपयांचे मोफत Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळते. यानंतर एअरटेल थँक्स बेनिफिट्स देखील उपलब्ध आहेत.
Airtel चा 699 रुपयांचा प्लॅन
Airtel चा दुसरा प्लॅन 699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे, जो 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. हा प्लॅनमध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट्ससह 3GB डेली डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. दरम्यान, या प्लॅनची व्हॅलिडिटी 599 रुपयांच्या प्लॅनच्या 28 दिवसांऐवजी 56 दिवसांची आहे. या प्लॅनसोबत Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
हे सुद्धा मिळतील बेनिफिट्स
एअरटेल थँक्स बेनिफिट्समध्ये दोन्ही प्लॅनमध्ये एक महिन्याची Amazon Prime Video Mobile Edition ट्रायल ( 699 प्लॅनद्वारे ऑफर केलेले नाही, कारण त्यात Amazon Prime सदस्यत्व आधीच समाविष्ट आहे) विंक म्युझिक, शॉ अकादमी, FASTag कॅशबॅक आणि बरेच काही समाविष्ट आहे.