सध्या दूरसंचार कंपन्यांमध्ये ग्राहकांना आपल्याकडे बांधून ठेवण्याची स्पर्धा सुरू आहे. अनेक कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि काही कंपन्या आपल्या ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स घेऊन येत असतात. सध्या इतर कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओ ही कंपनी अनेक ऑफर्स देत आहे. परंतु स्पर्धेच्या या युगात व्होडाफोनआयडिया आणि एअरटेल सारख्या कंपन्याही नवी ऑफर घेऊन आल्या आहेत. एअरटेल ही कंपनी १२९ रूपयांचा प्लॅन ऑफर करते. याच किंमतीचा प्लॅन रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनआयडियाकडेही आहे. पाहूया या प्लॅनमध्ये काय काय मिळतं.
Airtel चा १२९ रूपयांचा प्लॅन
Airtel च्या १२९ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी २४ दिवसांची आहे. यामध्ये सर्व मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जातात. यामध्ये केवळ १ जीबी डेटा दिला जातो. परंतु याचा वापर केव्हाही केला जाऊ शकतो. या प्लॅनमध्ये ३० दिवसांकरिता Amazon Prime Video चं सबस्क्रिप्शन दिलं जातं. याशिवाय कंपनी Hellotunes, Wynk Music आणि Airtel Xstream चं सबस्क्रिप्शन दिलं जातं.
Reliance Jio १२९ रूपयांचा प्लॅन
Reliance Jio चा १२९ रूपयांचा प्लॅन अधिक व्हॅलिडिटीसह आणि अधिक डेटासह मिळतो. परंतु यामध्य Amazon Prime Video चं सबस्क्रिप्शन दिलं जात नाही. यामध्ये २८ दिवसांसाठी एकूण २८ जीबी डेटा दिला जातो. तसंच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएसची सुविधाही देण्यात येते. याशिवाय या प्लॅनमध्ये ioTV, JioCinema आणि JioNews चं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
Vi चा १२९ रूपयांचा प्लॅन
व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये व्हॅलिडिटी एअरटेल प्रमाणे आणि डेटा जिओप्रमाणे देण्यात येतो. या प्लॅनसोबत २४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि एकूण २ जीबी डेटा देण्यात येतो. यामध्येही सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंह आणि ३०० एसएमएसची सुविधा देण्यात येते. परंतु यात OTT प्लॅटफॉर्म्स आणि अॅप्सचं सबस्क्रिप्शन दिलं जात नाही.