Airtel Recharge Plan : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी २ महिन्यांपूर्वी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे दर महिन्याला मोबाइलच्या रिचार्जचा खर्चही वाढलाय. जर तुम्ही पाहिलं असेल तर टेलिकॉम कंपन्यांचे बहुतांश रिचार्ज प्लॅन्स २८ दिवसांच्या वैधतेसह येतात. अशा तऱ्हेने पुढील रिचार्जची गरज महिना संपण्यापूर्वी येते. अशातच एका महिन्याच्या आत पुन्हा एकदा रिचार्ज करणं डोकेदुखी ठरू शकते.
रिचार्ज प्लॅन ३० दिवस चालेल
दरम्यान, काही टेलिकॉम कंपन्यांकडेही २८ ऐवजी ३० दिवसांच्या रिचार्ज प्लॅनचा पर्याय आहे. जर तुम्ही एअरटेलचे प्रीपेड युजर असाल तर तुम्ही ३० दिवसांचा रिचार्ज प्लॅन घेण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही एअरटेल युजर असाल तर एअरटेलचा हा प्लॅन तुम्हाला आवडू शकतो. एअरटेलचा ३० दिवसांचा म्हणजेच १ महिन्याचा वैधता असलेला रिचार्ज प्लॅन तुम्ही २१९ रुपयांत खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये एअरटेल प्रीपेड युजर्संना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग ची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी ३ जीबी डेटा आणि ३०० एसएमएसचा ही समावेश आहे. या प्लॅनमध्ये एअरटेल युजर्संना टॉकटाइम देखील दिला जात आहे. फोनमधील या बॅलन्समुळे ज्या एसएमएससाठी बॅलन्स आवश्यक आहे, ते मेसेजही तुम्ही सहज करू शकाल.
कोणासाठी हा प्लॅन आहे बेस्ट?
एअरटेलचा २१९ रुपयांचा रिचार्ज प्लान अशा युजर्ससाठी उत्तम आहे ज्यांना जास्त डेटाची गरज नाही. ज्यांच्या घरात वायफाय आहे किंवा ऑफिसमध्ये इंटरनेटची सुविधा आहे, त्यांच्यासाठी एअरटेलचा हा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन बेस्ट आहे. मात्र युजर्सला कॉलसाठी या प्लॅनमध्ये कोणतीही तडजोड करावी लागणार नाही. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.