Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel चा नवा प्लॅन; कुटुंबाला मिळणार फ्री डेटा कॉलिंगसह  Prime Video, Hotstar सब्सक्रिप्शन

Airtel चा नवा प्लॅन; कुटुंबाला मिळणार फ्री डेटा कॉलिंगसह  Prime Video, Hotstar सब्सक्रिप्शन

पाहा या प्लॅनसोबत कोणत्या मिळतायत सुविधा.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:15 PM2023-03-27T15:15:41+5:302023-03-27T15:15:54+5:30

पाहा या प्लॅनसोबत कोणत्या मिळतायत सुविधा.

Airtel s New family Plan Family will get Prime Video Hotstar subscription with free data calling know details compete jio | Airtel चा नवा प्लॅन; कुटुंबाला मिळणार फ्री डेटा कॉलिंगसह  Prime Video, Hotstar सब्सक्रिप्शन

Airtel चा नवा प्लॅन; कुटुंबाला मिळणार फ्री डेटा कॉलिंगसह  Prime Video, Hotstar सब्सक्रिप्शन

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलनं नवीन पोस्टपेड रिचार्ज प्लान लाँच केला आहे. नुकत्याच लाँच झालेल्या ब्लॅक सीरीजचा हा नवीन रिचार्ज प्लान आहे. यापूर्वी एअरटेलनं ५९९ रुपयांत प्लॅटिनम आणि ७९९ रुपयांना एअरटेल ब्लॅक लाँच केले होते. यानंतर Airtel ने नवीन ब्लॅक ९९८ रुपयांचा पोस्टपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे. एअरटेलच्या ब्लॅक ९९८ रुपयांच्या दोन पोस्टपेड कनेक्शनसह Xtreme फायबर ब्रॉडबँड कनेक्शन दिलं जात आहे.

एअरटेल ब्लॅक ९९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये १०५ जीबी डेटा आणि २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जात आहे. सोबतच अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसह १०० एसएमएस दिले जात आहे. अन्य बेनिफिट्सबद्दल बोलायचं झालं तर यातोय.

Jio नं दिलं Airtel ला टेन्शन, २४० रुपयांत ८४ दिवस रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही

कस्टमाईज करता येणार
तुम्हाला हा प्लॅन कस्टमाईजही करता येणार आहे.  सोबतच दोन पोस्टपेड कनेक्शनही दिले जातील. यात एक रेग्युलर आणि एक ॲड ऑन कनेक्शन दिलं जाईल. यासोबत यात एक्सट्रीम फायबर सेवाही दिली जाते. यासोबतच लँडलाईन सेवाही दिली जातेय. यात ग्राहकांना ४० एमबीपीएस ब्रॉडबँड कनेक्शन ऑफर केलं जात आहे. याशिवायत त्यात Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि Airtel Xstream ॲपची सुविधाही देण्यात येतेय. जर तुम्ही ५ जी सेवा मिळत असलेल्या भागांमध्ये राहत असाल तर तुम्हाला ५जी सेवांचा लाभही घेता येईल.

Web Title: Airtel s New family Plan Family will get Prime Video Hotstar subscription with free data calling know details compete jio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल