Airtel Rupees 3,359 One year Validity Plan: सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. कंपन्या आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहकांना टिकवण्यासाठी नवनवे प्लॅन्स लाँच करत आहेत. एअरटेल आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध ॲन्युअल प्लॅन्स ऑफर करत आहे. या प्लॅन्समध्ये १२ महिने सिम ॲक्टिव्ह असण्यासोबत अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, एसएमएस, इंटरनेट डेटा यासारखे सर्व फायदे उपलब्ध आहेत.
या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये एक वर्षासाठी OTT प्लॅटफॉर्मचे फायदे देखील उपलब्ध आहेत. एअरटेलचा हा ॲन्युअल प्लॅन 3,359 रुपयांचा आहे. परंतु त्याची मंथली किंमत केवळ 280 रुपये इतकी होते. ही किंमत तुमच्या मंथली प्लॅनपेक्षा खूप जास्त फायदे देत आहे.
एअरटेलचा 3,359 रुपयांचा ॲन्युअल प्लॅन आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच 12 महिने 24 तास तुम्ही तुमच्या कुटुंबाशी किंवा मित्रांसोबत तुम्हाला हवे तितके बोलू शकता. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळेल. हाय स्पीड डेटाची दैनंदिन मर्यादा संपल्यानंतर, मोबाइल डेटा स्पीड 64Kbps पर्यंत खाली येईल. यासोबतच दररोज 100 एसएमएस मोफत मिळणार आहेत. एअरटेलच्या प्लॅनमध्ये Xstream App Premium, मोफत हॅलो ट्यून्स, अनलिमिटेड डाऊनलोडसह Wynk Music सबस्क्रिप्शन मिळेल.
हे ओटीटी ॲप्सही मिळणार
एअरटेलच्या 3,359 रुपयांच्या ॲन्युअल प्लॅनमध्ये ग्राहकांना एक वर्षासाठी Amazon Prime मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल. यासोबतच डिस्ने हॉटस्टारचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शनही मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर या OTT प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकता.
महिन्याचा खर्च कमी
एअरटेलच्या 3,359 रुपयांच्या ॲन्युअल प्लॅनची किंमत सुमारे 280 रुपये प्रति महिना इतकी पडते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येतो. तसेच, तुम्ही तुमच्या मोबाईलवर Amazon Prime आणि Disney Hotstar वर्षभर पाहू शकता. जर तुम्ही एअरटेलच्या मंथली प्लॅनसोबत हा प्लॅन पाहिला तर हा एक अतिशय किफायतशीर आणि फायदेशीर प्लान दिसून येतो.