Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel च्या सुनील मित्तल यांना ब्रिटनचा 'नाईडहुड' सन्मान, पहिल्यांदाच भारतीयाचा गौरव

Airtel च्या सुनील मित्तल यांना ब्रिटनचा 'नाईडहुड' सन्मान, पहिल्यांदाच भारतीयाचा गौरव

किंग चार्ल्स यांच्या हस्ते सुनील भारती मित्तल यांचा सन्मान करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 02:50 PM2024-02-29T14:50:38+5:302024-02-29T14:52:08+5:30

किंग चार्ल्स यांच्या हस्ते सुनील भारती मित्तल यांचा सन्मान करण्यात आला.

Airtel s Sunil bharti Mittal gets Britain s knighthood from king charles united kingdom first ever for an Indian | Airtel च्या सुनील मित्तल यांना ब्रिटनचा 'नाईडहुड' सन्मान, पहिल्यांदाच भारतीयाचा गौरव

Airtel च्या सुनील मित्तल यांना ब्रिटनचा 'नाईडहुड' सन्मान, पहिल्यांदाच भारतीयाचा गौरव

भारती एंटरप्रायझेसचे  (Bharti Enterprises) संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) यांना युनायटेड किंगडममध्ये 'नाइटहूड' या मानद पदवीनं सन्मानित करण्यात आलं. भारत-ब्रिटन व्यापारी संबंध पुढे नेण्यासाठी किंग चार्ल्स यांनी सुनील भारती मित्तल यांना हा सन्मान दिला. यासह सुनील मित्तल हे 'नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर' (KBE) हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत. KBE हा ब्रिटिनद्वारे देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे. या अंतर्गत परदेशी नागरिकांना मानद पदवी दिली जाते.
 

भारतीय साहित्यातील एकमेव नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ नाथ टागोर यांना ब्रिटिश सरकारनं १९१५ मध्ये नाइटहूड किंवा सर ही पदवी दिली होती. पण रवींद्रनाथ नाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा तीव्र निषेध करत आपली पदवी परत केली.
 

काय म्हणाले मित्तल?
 

नाइटहूड ही मानद पदवी मिळाल्यानंतर सुनील भारती मित्तल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “किंग चार्ल्स यांच्याकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल मी खूप आभारी आहे. ब्रिटन आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत. हे संबंध आता वाढत्या सहकार्याच्या नव्या युगात प्रवेश करत आहेत. दोन महान देशांमधील आर्थिक आणि द्विपक्षीय व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत," असं सुनील भारती मित्तल म्हणाले.
 

"मी युकेच्या सरकारचा आभारी आहे, ज्यांचें समर्थन आणि व्यवसायाच्या आवश्यक गरजांकडे लक्ष हे देशाला आकर्षक गुंतवणूक बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे," असंही ते म्हणाले. सुनील भारती मित्तल यांता २००७ मध्ये 'पद्मभूषण' पुरस्कारानंही सन्मान करण्यात आला आहे.
 

टेलिकॉम टायकून म्हणून ओळख
 

सुनील भारती मित्तल हे टेलिकॉम टायकून म्हणून ओळखले जातात. त्यांची कंपनी एअरटेल देशातील सर्वात मोठ्या मोबाईल फोन ऑपरेटर्सपैकी एक आहे. एअरटेलचे ४७४ मिलियन ग्राहक आहेत. 

Web Title: Airtel s Sunil bharti Mittal gets Britain s knighthood from king charles united kingdom first ever for an Indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.