Join us  

जबरदस्त! ब्रिटनमध्येही एअरटेल चालणार; सुनील मित्तल ब्रिटिश टेलिकॉममधील २४ टक्के हिस्सा खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 6:26 PM

आता ब्रिटनमध्येही एअरटेलची धुन वाजणार आहे. ब्रिटिश टेलिकॉममधील २४ टक्के हिस्सा खरेदी करण्याबाबत करार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

एअरटेल ही देशातील दिग्गज दूरसंचार कंपनी आहे. आता ही कंपनी ब्रिटनमध्येही आपलं नाव करणार आहे. सुनील भारती मित्तल यांचा समूह ब्रिटनमधील सर्वात मोठ्या ब्रॉडबँड आणि मोबाइल कंपनी ब्रिटिश टेलिकॉम समूहातील २४.५ टक्के भागभांडवल सुमारे ४ अरब डॉलरला विकत घेणार आहे. भारती एंटरप्रायझेसची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक शाखा, भारती ग्लोबल, इस्रायली अब्जाधीश आणि गुंतवणूकदार पॅट्रिक द्राही यांच्या दूरसंचार समूह अल्टीसकडून बीटी ग्रुपमधील ९.९९ टक्के भागभांडवल तात्काळ विकत घेईल. आवश्यक नियामक मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित भागभांडवल विकत घेतले जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ग्रीन एनर्जी कंपनीला मिळाली ₹550 कोटींची ऑर्डर; शेअरने 2 वर्षात दिला 145% परतावा... 

कंपनीने या करारावर खुलासा केलेला नाही. पण काही तज्ञांच्या मतानुसार, १५ अरब डॉलरच्या मुल्यानुसार हा करार सुमारे ४ अरब डॉलर इतका असू शकतो. भारती एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. त्याचे सुमारे ४० कोटी ग्राहक आहेत. बीटीशीही त्यांचे पूर्वीचे संबंध आहेत. BT ने १९९७ ते २००१ या काळात भारती एअरटेलमध्ये २१ टक्के हिस्सा घेतला होता.

दोन्ही कंपन्यांचे जुने संबंध

कंपनीला ना पूर्णपणे बीटी घ्यायची आहे आणि ना त्यांच्या बोर्डावर कोणत्याही प्रकारचे स्थान हवे आहे. कर्जबाजारी असलेले ड्राही यांच्या नियंत्रणाखाली असलेला अल्टाइस,बीटीमधून बाहेर पडत आहे. त्यांच्या आधी २०२१मध्ये पहिल्यांदा बीटीमध्ये हिस्सेदारी घेतली होती. यानंतर त्यांनी १२ टक्के भागभांडवल विकत घेतले आणि त्यांची भागीदारी २४.५ टक्के केली.

"भारती एअरटेल आणि बीटी यांचे दोन दशकांहून अधिक जुने नाते आहे. BT चे १९९७-२००१ या कालावधीत भारती एअरटेल लिमिटेडच्या संचालक मंडळावर दोन सदस्य होते आणि २१ टक्के भागभांडवल होते. आज भारती समूहाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे कारण आम्ही बीटीमध्ये गुंतवणूक करत आहोत, जी एक प्रतिष्ठित ब्रिटिश कंपनी आहे".

सुनील भारती मित्तल, भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष

टॅग्स :एअरटेलसुनिल मित्तल