गेल्या महिन्यात एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी येत्या काही दिवसांमध्ये 5G सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. तर दुसरीकडे महिन्याभरात 5G सेवा सुरू करणार असल्याचं एअरटेलनं म्हटलं होतं. पहिल्या टप्प्यात कंपनी मेट्रो शहरांमध्ये सेवा देणार आहे.
देशातील अन्य शहरी भागांमध्ये 2023 च्या अखेरपर्यंत 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. तर ग्रामीण भागांमध्ये 2024 पर्यंत 5G सेवा सुरू करणार आहे. ज्यांनी आपलं 4G सिमकार्ड अपग्रेड केलं आहे त्यांना सिमकार्ड अपग्रेड करण्याची गरज भासणार नसल्याचं कंपनीनं म्हटलं. तुमच्या शहरात 5G सेवा मिळेल किंवा नाही याची माहिती तुम्हाला एअरटेल थँक्स अॅपवर मिळेल. सेवा लाँच झाल्यानंतर ही सेवा लाईव्ह केली जाईल. त्यामुळे सध्या तुम्हाला याची माहिती मिळणार नाही.
स्पेक्ट्रम लिलावादरम्यान कंपनीनं 43084 कोटी रूपये खर्च केली. कंपनीनं देशात इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नोकिया, सॅमसंग आणि एरिक्सन यांच्याशी करार केला आहे. कंपनी देशात नॉन स्टँडअलोन 5G सेवा देईल. तर जिओ देशात स्टँडअलोन 5G सेवा देईल. यामुळ अधिक स्पीड मिळेल. स्पेक्ट्रम लिलावादरम्यान जिओनं सर्वाधिक खर्च केला होता. तसंच ऑक्टोबर महिन्यात 5G सेवा सुरू करणार असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं.