नवी दिल्ली : 2022 मध्येही काही प्री-पेड प्लॅन महाग होतील, असे एअरटेलने (Airtel) गेल्या आठवड्यात सांगितले होते. तर यावेळी देखील कंपनी आपले प्लॅन महाग करण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये देखील एअरटेलचे प्लॅन पहिले महाग झाले होते. आता एअरटेलने आपल्या प्री-पेड प्लॅन्सपैकी एक अपडेट केला आहे, यानंतर युजर्संना अनेक ओव्हर द टॉप (OTT) फायदे मिळत आहेत.
एअरटेलचा 2,999 रुपयांचा प्लॅन झाला अपडेट!
एअरटेलने आपल्या 2,999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अपडेट केला आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस (SMS) मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर 2 जीबी डेटा देखील उपलब्ध असेल. यासोबतच प्लॅनमध्ये आता ग्राहकांना Disney + Hotstar ची मोबाइल एडिशन मोफत मिळणार आहे.
याशिवाय, ग्राहकांना Airtel Thanks अॅपसह Amazon Prime Video Mobile Edition, Wynk Music, Shaw Academy आणि FASTag सह एका महिन्यासाठी 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. दरम्यान, याआधी या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळत नव्हते. कंपनीच्या वेबसाइटशिवाय हा प्लॅन अॅपवरही पाहता येईल. या प्लॅनमध्ये बदल केल्यानंतर 2,999 रुपयांचा प्लॅन आता 3,359 रुपयांच्या प्लॅनसारखा झाला आहे. 3,359 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 2,999 रुपयांचे फायदे उपलब्ध आहेत.