Join us  

Airtel vs Jio: 'या' प्लॅनमध्ये मिळतोय अनलिमिटेड डेटा, किंमत फक्त ९९ रुपये; पाहा बेस्ट ५ डेटा प्लान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 2:50 PM

एअरटेल (Airtel) आणि जिओ (Reliance Jio) व्यतिरिक्त व्होडाफोन आयडियानंही (Vodafone-Idea) आपले रिचार्ज प्लान महाग केले आहेत. यानंतर युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.

एअरटेल (Airtel) आणि जिओ (Reliance Jio) व्यतिरिक्त व्होडाफोन आयडियानंही (Vodafone-Idea) आपले रिचार्ज प्लान महाग केले आहेत. यानंतर युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. महागड्या रिचार्जमुळे अनेक युजर्स आपला नंबर बीएसएनएलवर पोर्ट करून घेत आहेत, पण सगळेच लोक तसं करू शकत नाहीत. अशावेळी त्यांना महागडे रिचार्ज करावे लागतात. भारतात स्मार्टफोनच्या वाढत्या वापरानंतर डेटा वापरात प्रचंड वाढ झाली आहे. आज आम्ही तुम्हाला एअरटेल आणि जिओच्या डेटा प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

Airtel डेटा प्लान

एअरटेलचे अनेक डेटा प्लॅन आहेत. सर्वात स्वस्त ११ रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये तुम्ही एक तास अनलिमिटेड डेटा वापरू शकता. ३३ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा मिळतो, जो १ दिवसासाठी वैध आहे. ४९ रुपयांचा प्लॅन आहे ज्यात १ दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा मिळतो, त्याची मर्यादा २० जीबी आहे. तसंच ९९ रुपयांचा प्लॅन आहे, ज्यात २ दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा मिळतो. यात दररोज २० जीबी डेटा मिळतो.

Reliance Jio डेटा प्लान

जिओचा ४९ रुपयांचा क्रिकेट ऑफर डेटा प्लॅन आहे, ज्यात एका दिवसासाठी अनलिमिटेड डेटा म्हणजेच २५ जीबी मिळतो. दुसरा प्लॅन १७५ रुपयांचा आहे. यात २८ दिवसांसाठी १० जीबी डेटा मिळतो. यात सोनी लिव्ह, झी ५, जिओसिनेमा प्रीमियम आदींचे सब्सक्रिप्शन आहे. २८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३० दिवसांच्या वैधतेसह ४० जीबी डेटा मिळतो. ३५९ रुपयांचा प्लॅन आहे, ज्यात ३० दिवसांच्या वैधतेसह एकूण ५० जीबी डेटा मिळतो.

टॅग्स :रिलायन्स जिओएअरटेल