Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio चा शानदार प्लॅन! कमी किमतीत 84 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा आणि बरेच काही

Jio चा शानदार प्लॅन! कमी किमतीत 84 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा आणि बरेच काही

Airtel, Jio, Vodafone-Idea : बहुतेक ग्राहक आर्थिकदृष्ट्या योग्य प्लॅन्स तसेच 1.5GB डेली डेटा प्लॅन्स सारखे ऑपरेटरकडून पुरेसा डेटा ऑफर करणारे प्लॅन्स शोधत आहेत. Jio, Airtel आणि Vodafone-Idea चे धमाकेदार प्लॅन्स आहेत, जे खूप लोकप्रिय आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:30 PM2022-03-23T12:30:29+5:302022-03-23T12:31:05+5:30

Airtel, Jio, Vodafone-Idea : बहुतेक ग्राहक आर्थिकदृष्ट्या योग्य प्लॅन्स तसेच 1.5GB डेली डेटा प्लॅन्स सारखे ऑपरेटरकडून पुरेसा डेटा ऑफर करणारे प्लॅन्स शोधत आहेत. Jio, Airtel आणि Vodafone-Idea चे धमाकेदार प्लॅन्स आहेत, जे खूप लोकप्रिय आहेत.

airtel vs jio vs vi who offers better long term 1.5gb daily data prepaid plans check all benefits | Jio चा शानदार प्लॅन! कमी किमतीत 84 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा आणि बरेच काही

Jio चा शानदार प्लॅन! कमी किमतीत 84 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा आणि बरेच काही

नवी दिल्ली : देशातील दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक डेली डेटा प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. बहुतेक ग्राहक आर्थिकदृष्ट्या योग्य प्लॅन्स तसेच 1.5GB डेली डेटा प्लॅन्स सारखे ऑपरेटरकडून पुरेसा डेटा ऑफर करणारे प्लॅन्स शोधत आहेत. Jio, Airtel आणि Vodafone-Idea चे धमाकेदार प्लॅन्स आहेत, जे खूप लोकप्रिय आहेत. यातच दररोज 1.5GB डेटा ऑफर करणार्‍या दीर्घकालीन जिओचा प्रीपेड प्लॅन आहे. जो 84 दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसाठी 666 रुपयांच्या किमतीत दररोज 1.5GB डेटा ऑफर केला जाते. दरम्यान,  io, Airtel आणि Vodafone-Idea प्लॅन्सच्या दृष्टीने तिघांपैकी कोणते चांगले आहेत ते जाणून घेऊया...

Vodafone Idea Prepaid Plans
व्होडाफोनआयडियाकडे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. टेल्को एक डेली डेटा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामध्ये 666 रुपयांत 77 दिवसांच्या वैधता कालावधीसाठी 1.5GB डेटा दररोज मिळत आहे. व्होडाफोनआयडियाने आणखी एक प्रीपेड प्लॅन ऑफर केला आहे, जो 84 दिवसांच्या वैधता कालावधीसाठी 1.5GB डेटा दररोज ऑफर केला जात आहे, ज्याची किंमत 799 रुपये आहे. 

याशिवाय, दोन वर्षांच्या प्रीपेड प्लॅन देखील ऑफर करते. तसेच, व्होडाफोन आयडियाचे 2,899 आणि 3,099 रुपयांचे प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 1.5GB डेटा देतात. 3,099 रुपयांचा प्लॅन Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह देखील येतो. व्होडाफोन आयडियाच्या या सर्व प्लॅनमध्ये Binge All Night, Vi Movies & TV आणि डेटा रोलओव्हर सारख्या अतिरिक्त बेनिफिट्ससह अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS दिले जातात. 

Jio Prepaid Plans
दररोज 1.5GB डेटा ऑफर करणार्‍या दीर्घकालीन जिओचा प्रीपेड प्लॅन आहे. जो 84 दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसाठी 666 रुपयांच्या किमतीत दररोज 1.5GB डेटा ऑफर केला जाते. हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात. याशिवाय, टेल्को एक वर्षाचा प्रीपेड प्लॅन देखील ऑफर करते, जी 2,545 रुपयांच्या 365 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 1.5GB डेटा ऑफर केला जात आहे. वर्षभराच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत.

Airtel Prepaid Plans
विशेष म्हणजे, एअरटेल समान डेटा लाभांसह दोन दीर्घकालीन प्लॅन ऑफर करते, परंतु वार्षिक प्लॅन ऑफर करत नाही. टेल्को डेली डेटा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे, जो दररोज 1.5GB डेटा वैधता कालावधीसाठी 77 दिवसांच्या 666 च्या किमतीत येत आहे. एअरटेल आणखी एक प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे, जो 84 दिवसांच्या वैधतेसाठी  1.5GB डेटा दररोज ऑफर केला जातो. 799  रुपयांत दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS तसेच मोबाइल आवृत्ती Amazon Prime Video ची विनामूल्य चाचणी आणि इतर काही फायदे मिळतात.

Web Title: airtel vs jio vs vi who offers better long term 1.5gb daily data prepaid plans check all benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.