ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - टेलीकॉम क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्या एअरटेल आणि रिलायन्स जिओमधील वाद आज चव्हाट्यावर आला. निमित्त होतं मोबाइल वॉलेट कंपनी पेटीएमचे प्रमुखे विजय शेखर शर्मा यांनी केलेलं ट्विट. शर्मा यांनी त्यांना इंटरनेट सेवा पुरवणा-या एअरटेलकडे जास्त डेटाची मागणी केली त्यावर जिओने कमी पैशांमध्ये चांगला प्लॅन देण्याची ऑफर त्यांना दिली.
शर्मा यांनी ट्विट करून 'मी एअरटेल कस्टमर केअरला फोन केला आणि 2 हजार 999 रूपयांत प्रतिमहिना 15GB डेटा ऐवजी तेवढ्याच पैशांमध्ये 60 GB डेटा वापरण्याचा पर्याय त्यांनी दिला' अशी माहिती दिली.
Called Airtel Customer care and they gave me 60 GB/month data option for current 15 GB monthly limit (on ₹2,999 plan). Pro tip: call them !
— Vijay Shekhar (@vijayshekhar) March 5, 2017
रिलायन्स जिओने लगेच यावर प्रतिक्रिया दिली. शर्मा यांना टॅग करून त्यांनी 'आता दुसरं कोणी नाही जिओ करा, आम्हाला फोन न करता 499 रूपयात 56 GB डेटा मिळत असताना 2 हजार 999 का खर्च करतात' असं ट्विट केलं.
शर्मा यांनी जिओने दिलेल्या ऑफरवर आनंद व्यक्त करत ऑफर स्वीकारण्याची घोषणा केली.. @vijayshekhar Ab aur koi nahi... #Jio Karo! Why pay 2999 when u can get 56GB @ 499 without calling us. :)
— Reliance Jio (@reliancejio) March 5, 2017