Join us

Airtel Xstream Box च्या किंमतीत मोठी कपात, Free मिळणार 'इतक्या' OTT अ‍ॅप्संचं सबस्क्रिप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 5:13 PM

Airtel Xstream : पाहा यात कोणते मिळतायत बेनिफिट्स.

कंपनीकडून Airtel Xstream Box ची किंमत 499 रुपयांनी कमी करून 2,000 रुपये करण्यात आली आहे. जे Xstream बॉक्स पर्यायासह नवीन एअरटेल डिजिटल टीव्ही कनेक्शन घेत आहेत, त्यांच्यासाठीच ही नवी किंमत लागू होणार आहे. डायरेक्ट-टू-होम (DTH) सेट-टॉप बॉक्स आता Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar सह ओव्हर-द-टॉप (OTT) अॅप्सच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. एअरटेलने सप्टेंबर 2019 मध्ये Xstream Stick सोबत Xstream Box सादर केला होता. दोन्ही डिव्हाइसेस 3,999 रुपये किंमतीत बाजारात उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

Airtel च्या साइटवर Airtel Xstream Box ची किंमत 2,000 रुपये केल्याचं दिसत आहे. तसंच इंटरनेट आर्काइव्हजवर दिसलेल्या तपशीलांनुसार बा बॉक्स यापूर्वी 2,499 रुपयांना उपलब्ध होता.

मोफत OTT सबस्क्रिप्शनकमी केलेल्या किमतीच्या व्यतिरिक्त, नवीन Xstream बॉक्स घेणाऱ्या ग्राहकांसाठी Airtel Disney+ Hotstar, Amazon Prime Video, SonyLIV, Eros Now, Hungama आणि इतर OTT अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. DTH- फोकस्ड साइट DreamDTH च्या रिपोर्टनुसार कमी केलेली किंमत एअरटेल साइटद्वारे तसेच अधिकृत डीलर्सद्वारे नव्या कनेक्शनसाठी लागू आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

बंडल्ड बेनिफिट्समध्ये Disney+ Hotstar चे एका वर्षाचे सबस्क्रिप्शन, Amazon Prime Video चे तीन महिने, SonyLIV, Eros Now आणि Hungama यांसह अन्य अॅप्सचं सबस्क्रिप्शनही देण्यात येणार असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. गेल्या महिन्यात, एअरटेलने 15 भारतीय आणि जागतिक OTT प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचण्यासाठी Xstream प्रीमियम सेवा सुरू केली. दरमहा 149 रुपये किंवा वार्षिक 1,499 रुपयांपासून याची सुरूवात होते.

टॅग्स :एअरटेलअ‍ॅमेझॉननेटफ्लिक्स