भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धमाका करणा-या रिलायन्स जिओला टक्कर देण्याचा सर्वच प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहे. देशातील प्रथम क्रमांकाची टेलिकॉम कंपनी एअरटेलने ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी खास ऑफर आणल्या आहेत. 8 रुपयांपासून 399 पर्यंत एअरटेलने आपले प्लॅन जाहीर केले आहेत. यामध्ये व्हाईस कॉल आणि डेटा प्लॅन आहेत. तर जाणून घेऊयात या प्लॅनबद्दल...
8 रुपये - या प्लॅनमध्ये लोकल आणि एसटीडी कॉल्स 30 पैसे प्रति मि. दराने 56 दिवसांसाठी.15 रुपये - या प्लॅनद्वारे एअरटेल टू एअरटेल 27 दिवस 10 पैसे प्रति मि. दाराने. 40 रुपये - या रिचार्जवर 35 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. यासाठी कोणतीही वैधता नाही. 60 रुपये - या रिचार्जवर 55 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. यासाठी कोणतीही वैधता नाही90 रुपये - या रिचार्जवर 88 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. यासाठी कोणतीही वैधता नाही149 रुपये - या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी एयरटेल टू एयरटेल कॉल फ्री असतील. तसेच 2 जीबी 4 जी डेटा मिळेल. 198 रुपये - 28 दिवसांसाठी लोकल आणि एसटीडी कॉल फ्री, त्याचबरोबर दिवसाला 1 जीबी डेटा मिळेल. 199 रुपये - 29 दिवसांसाठी लोकल आणि एसटीडी कॉल फ्री, त्याचबरोबर प्रत्येक दिवशी 1 जीबी डेटा मिळेल. 295 रुपये - 84 दिवसांसाठी लोकल आणि एसटीडी कॉल फ्री असतील. 349 रुपये - 28 दिवसांसाठी लोकल आणि एसटीडी कॉल फ्री, त्याचबरोबर दिवसाला 28 जीबी डेटा मिळेल. प्रतिदिवस एक जीबी वापरता येईल. 399 रुपये - 28 दिवसांसाठी लोकल आणि एसटीडी कॉल फ्री, त्याचबरोबर दिवसाला 28 जीबी डेटा मिळेल. प्रतिदिवस एक जीबी वापरता येईल. रोमिंगमध्ये आउटगोइंग कॉल्स फ्री.
BSNLच्या पोस्टपेड यूजर्ससाठी नवे प्लॅन - आपल्या पोस्टपेड यूजर्ससाठी BSNL कंपनीनं एक नवा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सला तब्बल 360 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची किंमत 444 रुपये आहे. या स्पेशल टेरिफ प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 4 जीबी डेटा मिळणार आहे. 4 जीबी डेटानंतर यूजर्सला डेटा मिळत राहिल पण त्याचा स्पीड मात्र कमी होईल. हा प्लॅन 90 दिवसांसाठी वैध असणार आहे.याशिवाय कंपनीनं 298 रुपयांचा देखील आणखी एक प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग देण्यात आलं आहे. मात्र, 1 जीबी डेटानंतर या स्पीड कमी होईल. तसेच हा प्लॅन 23 दिवसांसाठी वैध असेल.