Join us

एअरटेलची जिओला टक्कर, कंपनीने लाँच केली धमाकेदार ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 4:24 PM

जिओने मार्केटमध्ये हाहाकार उडवून दिल्यानंतर सर्वच कंपन्यांकडून ग्राहकांना स्वस्तात स्वस्त डेटा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता, एअरटेलने धमाका ऑफर सुरु केली आहे. त्यानुसार केवळ

मुंबई - जिओने मार्केटमध्ये हाहाकार उडवून दिल्यानंतर सर्वच कंपन्यांकडून ग्राहकांना स्वस्तात स्वस्त डेटा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता, एअरटेलने धमाका ऑफर सुरु केली आहे. त्यानुसार केवळ 47 रुपयांत ग्राहकांना कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा मिळणार आहे. विषेश म्हणजे याची वैधता 28 दिवसांची असेल. 47 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकाला 7500 लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग सेकंदचा लाभ घेता येणार आहे. 

एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी 47 रुपयांचा हा प्लॅन जारी केला आहे. जिओच्या 52 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना अशाच प्रकारची सुविधा देण्यात येते. तर वोडाफोनकडूनही 47 रुपयांच्या प्रिपेडवर अशीच टॅरिफ ऑफर देण्यात आली आहे. एअरटेलचा एक प्रिपेड प्लॅन 99 रुपयांचा आहे. त्यामध्ये ग्राहकाला 1 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. तसेच सोबत 100 एसएमएसही मुफ्तपणे देण्यात येत आहेत. एअरटेलच्या 47 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला 50 एसएमएस आणि 500 एमबी डेटा मिळणार आहे. हा डेटा 2जी, 3जी आणि 4जी स्वरुपात वापरण्यात येईल.

जिओचा 49 रुपयांचा प्लॅन ग्राहकांना लाभदायी ठरत आहे. जिओच्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकास अनलिमिटेड कॉलिंग, 1जीबी डेटा आणि 50 एसएमएसची सुविधा मिळत आहे. तसेच हायस्पीड डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट सुरुच राहिल, पण इंटरनेटचा स्पीड कमी होऊन तो 64kbps होणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. मात्र, ही सुविधा जिओ फोन आणि जिओ फोन 2 साठी लागू करण्यात आली आहे.   

टॅग्स :एअरटेलजिओइंटरनेट