आज आम्ही आपल्याला एका अशा शेअर संदर्भात माहिती देणार आहोत, ज्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या शेअरचे नाव आहे अजंता फार्मा. अजंता फार्माच्या शेअरने दीर्घ काळासाठी गुंतवणूक केलेल्या आपल्या गुंतवणूकदारांना 55,336 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.
अजंता फार्मा कंपनीने आज मंगळवारी बोनस शेअर्स देण्यासंदर्भात घोषणा केली आहे. यासंदर्भात कंपनीच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत बोनस इक्विटी शेअर्स 1:2 या प्रमाणात जारी करण्यास मान्यता दिली आहे. हे कंपनीच्या शेअरधारकांच्या अप्रूव्हल अंतर्गत आहे. अजंता फार्माचे शेअर बीएसईवर जवळपास 4 टक्क्यांच्या घसरणीसह 1,652.30 रुपयांवर बद झाले.
19 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती -
अजंता फार्माचा शेअर 28 मार्च 2003 रोजी एनएसईवर 2.98 रुपयांना होता. तो वाढून 1600 वर गेला. म्हणजेच या काळात या फार्मा कंपनीच्या शेअरने जवळपास 55336.24 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच, या शेअर्समध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने 2003 मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली ही गुंतवणूक कायम ठेवली असती, तर त्याचे आता 5.54 कोटी रुपये झाले असते.
बोनस शेअर म्हणजे काय? -
जेव्हा एखाद्या कंपनीला आपल्या उद्योगातून अतिरिक्त नफा मिळतो, तेव्हा त्या लाभातील एक भाग कंपनी आपल्या Reserve आणि Surplus मध्ये राखून ठेवते. यानंतर कंपनी रिझर्व्ह आणि सरप्लसमधूनच, आपल्या गुंतवणूकदारांसाठी अतिरिक्त शेअर्स जारी करते. यालाच बोनस शेअर असे म्हणतात.