Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'अबकी बार मोदी सरकार'चा नारा देणारे अजय सिंह बनणार NDTV चे नवीन मालक

'अबकी बार मोदी सरकार'चा नारा देणारे अजय सिंह बनणार NDTV चे नवीन मालक

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे नियंत्रण लवकरच स्पाईस जेटचे सहसंस्थापक आणि मालक अजय सिंह यांच्याकडे येणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:41 AM2017-09-22T11:41:59+5:302017-09-22T12:02:10+5:30

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे नियंत्रण लवकरच स्पाईस जेटचे सहसंस्थापक आणि मालक अजय सिंह यांच्याकडे येणार आहे.

Ajay Singh, the new owner of Nadiadwala, will now be the slogan of Modi Government | 'अबकी बार मोदी सरकार'चा नारा देणारे अजय सिंह बनणार NDTV चे नवीन मालक

'अबकी बार मोदी सरकार'चा नारा देणारे अजय सिंह बनणार NDTV चे नवीन मालक

Highlights अजय सिंह यांनी एनडीटीव्ही वाहिनीतील मोठा हिस्सा खरेदी केला आहे.अजय सिंह हे 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होते.

नवी दिल्ली - एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे नियंत्रण लवकरच स्पाईस जेटचे सहसंस्थापक आणि मालक अजय सिंह यांच्याकडे येणार आहे. अजय सिंह यांनी एनडीटीव्ही वाहिनीतील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. सध्या एनडीटीव्हीचे नियंत्रण प्रसिद्ध पत्रकार प्रणव रॉय यांच्याकडे आहे. या वाहिनीचे संस्थापक प्रणव रॉय, राधिका रॉय आणि प्रमोटर कंपनी आरआरपीआर होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड सीबीआय चौकशीचा सामना करत आहेत. 

शेअर्सच्या व्यवहारात पारदर्शकता नसून लपवाछपवी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याच प्रकरणी रॉय यांची चौकशी सुरु आहे. अजय सिंह हे 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होते. एनडीटीव्ही वाहिनी खरेदी करण्याचा निर्णय पक्का झाला असून, वाहिनीसह संपादकीय अधिकार अजय सिंह यांच्या हाती जाणार आहेत अशी सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली. 

5 जूनला सीबीआयने रॉय यांच्या निवासस्थानी छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. छापेमारीची ही कारवाई म्हणजे पत्रकारीतेच्या स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले होते. स्पाईस जेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांच्याकडे एनडीटीव्हीचे 40 टक्के शेअर्स असतील. प्रणव आणि राधिका रॉय यांच्याकडे 20 टक्के शेअर्स असतील. 

मुंबई शेअर बाजारातील जून 2017 पर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीटीव्हीच्या प्रमोटर्सकडे 61.45 टक्के हिस्सा आहे. 38.55 टक्के हिस्सा सार्वजनिक शेअरधारकांकडे आहे. अजय सिंह एनडीटीव्हीचे 400 कोटीचे कर्जही चुकवतील हा एकूण व्यवहार 600 कोटींचा असून, त्यातील 100 कोटी रुपये रॉय कुटुंबाला देण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. 

स्पाईस जेटचा प्रवास 
दिवाळखोरीच्या उंबरठयावरुन फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणा-या स्पाईस जेटने यावर्षी बोईंगकडे विमान खरेदीची सर्वात मोठी ऑर्डर नोंदवली. स्पाईस जेट बोईंगकडून एकूण 205 विमाने विकत घेणार आहे. हा सर्व व्यवहार 1.5 लाख कोटी रुपयांचा आहे. स्पाईस जेट बंद होण्याच्या मार्गावर असताना अजय सिंह यांनी कंपनीचे नेतृत्व स्वीकारले आणि कंपनीला नफ्यात आणले. आमच्या कंपनीची जी यशोगाथा आहे तशी आज जगात फार कमी उदहारणे आहेत असे त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Ajay Singh, the new owner of Nadiadwala, will now be the slogan of Modi Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.