ओमाहा (अमेरिका) - बर्कशायर हाथवेचे विद्यमान संस्थापक मुख्याधिकारी वॉरेन बफे निवृत झाल्यानंतर त्यांची जागा भारतीय असलेले अजित जैन घेणार काय, याबाबत जगभर प्रचंड औत्सुक्य आहे.
जगातील तिसऱ्या क्रमांकाचे धनिक वॉरेन बफे सध्या ८८ वर्षांचे आहेत. बर्कशायर हाथवेची वार्षिक सर्वसाधारण सभा लवकरच आहे. त्यात वॉरेन बफे निवृत्तीची घोषणा करू शकतात. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ग्रेगरी अबेल (५७) व अजित जैन (६७) ही नावे आघाडीवर आहेत.
बर्कशायर हाथवेमध्ये जैन १९८६ साली आले, तर अबेल १९९२ साली. दोघांनाही विमा कंपन्यांत गुंतवणुकीचा प्रदीर्घ अनुभव आहे. जैन सध्या बर्कशायर हाथवेच्या विमा व्यवसाय विभागाचे प्रमुख आहेत. त्यांचे पारडे जड मानले जाते.
मूळ जन्म ओडिशाचा
जैन यांचा जन्म २३ जुलै १९५१ रोजी ओडिशामध्ये झाला. त्यांनी खरगपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजीमधून १९७२ साली मेकॅनिकल इंजिनीअरिंग बी.टेक.ची पदवी घेतली व १९७८ साली अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी संपादन केली आहे.
वॉरेन बफे यांचे उत्तराधिकारी बनणार अजित जैन?
बर्कशायर हाथवेचे विद्यमान संस्थापक मुख्याधिकारी वॉरेन बफे निवृत झाल्यानंतर त्यांची जागा भारतीय असलेले अजित जैन घेणार काय, याबाबत जगभर प्रचंड औत्सुक्य आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:49 AM2019-05-05T06:49:20+5:302019-05-05T06:49:37+5:30