Lokmat Money > बिझनेस न्यूज > Akasa Airचा मेगा प्लान! १ हजार जागांसाठी मोठी भरती; शेकडो विमानांची देणार ऑर्डर

Akasa Airचा मेगा प्लान! १ हजार जागांसाठी मोठी भरती; शेकडो विमानांची देणार ऑर्डर

नवीन एअरलाइन्स Akasa Air उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 02:04 PM2023-03-26T14:04:30+5:302023-03-26T14:05:21+5:30

नवीन एअरलाइन्स Akasa Air उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

akasa air mega plan for expansion company will hire 1000 people by march 2024 and airline to go international soon | Akasa Airचा मेगा प्लान! १ हजार जागांसाठी मोठी भरती; शेकडो विमानांची देणार ऑर्डर

Akasa Airचा मेगा प्लान! १ हजार जागांसाठी मोठी भरती; शेकडो विमानांची देणार ऑर्डर

Akasa Air: TATA समूहाने अलीकडेच Air India साठी शेकडो विमानांची ऑर्डर देऊन ऐतिहासिक कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर एवढी मोठी ऑर्डर दिल्यानंतर टाटा ग्रुप एअर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियाही सुरू करत आहे. यातच आता शेअर बाजारातील बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची अकासा एअरने कामकाज वाढवण्याच्या योजनेवर प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून नवीन विमानांची ऑर्डर आणि भरती प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. 

Akasa Air चे CEO विनय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मार्च २०२४ पर्यंत १ हजार जणांची भरती करेल. तसेच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजारांवर नेईल. यामध्ये सुमारे १,१०० फक्त वैमानिक आणि विमान कर्मचारी असतील. विमान वाहतूक क्षेत्रात भरती नेहमीच मोठ्या प्रमाणात केली जाते, असे त्यांनी अधोरेखित केले. केवळ ७ महिन्यांपूर्वी बाजारात दाखल झालेली अकासा एअर या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा विचार करीत आहे. कंपनीने २०२३ च्या अखेरीस ३ अंकांत म्हणजेच १०० हून अधिक नवीन विमाने ऑर्डर करण्याची योजना आखली आहे. 

आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू करू शकणार 

आकासा एअरने सध्या ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. यापैकी १९ विमाने आधीच ताफ्यात सामील झाली असून, एप्रिलमध्ये २० वे विमान मिळणार आहे. यामुळे कंपनी आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू करू शकणार आहे. ७२ विमानांसाठीची कंपनीची ऑर्डर २०२७ पर्यंत पूर्ण होईल. कंपनी पुढील आर्थिक वर्षात आपल्या ताफ्यात ९ विमानांची भर घालणार असून, तिच्या ताफ्यातील विमानांची संख्या २८ वर जाईल. सध्या कंपनी दररोज ११० उड्डाणे चालवते. उन्हाळी हंगामाच्या अखेरीस ती १५० उड्डाणे करण्यात येणार आहेत. आकासा एअरने देशांतर्गत बाजारात ३.६१ लाख कंपन्यांना आपली सेवा दिली आहे. 

दरम्यान, एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर टाटा समूहाने ४७० विमानांची ऑर्डर दिली. टाटा समूहाच्या नेतृत्वाखाली एअर इंडियानेही स्वतःला पुन्हा जागतिक एअरलाइन बनवण्याची योजना आखली आहे. एअर इंडियाने २०२३ च्या अखेरीस ५ हजाराहून अधिक लोकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सुमारे ४,२०० केबिन क्रू आणि सुमारे ९०० वैमानिकांची भरती केली जाणार आहे. सध्या एअर इंडियाकडे १६०० पायलट आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: akasa air mega plan for expansion company will hire 1000 people by march 2024 and airline to go international soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.