Akasa Air: शेअर मार्केटचे 'बिगबुल' राकेश झुनझुनवाला यांच्या 'आकासा'(Rakesh Jhunjhunwala Akasa Air) एअरचे पहिले विमान(बोईंग 737 मॅक्स) मंगळवारी दिल्लीविमानतळावर दाखल झाले. Akasa Air ला आता व्यावसायिक ऑपरेशन्स सुरू करण्यापूर्वी देशातील एअरलाइन्स क्षेत्राचे नियामक DGCA कडून एअर ऑपरेटर परमिट घ्यावे लागेल. आकासा एअरच्या म्हणण्यानुसार, हे विमान 15 जून रोजी अमेरिकेतील सिएटल येथे कंपनीला सुपूर्द करण्यात आले. अकासा एअरने गेल्या नोव्हेंबरमध्ये बोईंगला ऑर्डर केलेल्या 72 बोइंग 737 MAX विमानांपैकी ही पहिली डिलिव्हरी आहे.
Touchdown! 🥳#QPComesHome#ItsYourSkypic.twitter.com/dKdTU4hNdV
— Akasa Air (@AkasaAir) June 21, 2022
Akasa Air च्या म्हणण्यानुसार, कंपनीने पहिल्या बोईंग 737 MAX विमानाचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टीमच्या उपस्थितीत स्वागत केले आहे. Akasa Air चे MD आणि CEO विनय दुबे म्हणाले की, 'Akasa Air हे अलिकडच्या काळात विमान क्षेत्रातील प्रगतीचे एक प्रमुख उदाहरण आहे. आमच्यासाठी आणि भारतीय विमान वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे."
Welcome home! 🥳 https://t.co/iTYxhZEIc0— Boeing India (@Boeing_In) June 21, 2022
बोईंग इंडियानेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करुन आकासाचे भारतात स्वागत केले. बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते म्हणाले की, बोइंगला आकासा एअरसोबत भागीदारी केल्याचा अभिमान आहे. आकासाने हवाई प्रवास सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी परवडणारा बनवण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.
एअर ऑपरेटर परवाना कसा मिळेल?
Akasa Air ला आता उड्डाण करण्यासाठी हवाई वाहतूक क्षेत्र नियामक DGCA कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र प्राप्त करावे लागेल. त्यानंतर विमान कंपनी आपले व्यावसायिक उड्डाण सुरू करू शकेल. Akasa Air च्या प्रोव्हिंग फ्लाइटला एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विमान वाहतूक नियामक DGCA चे समाधान करण्यासाठी दिल्लीहून अनेक वेळा उड्डाणे करावी लागतील. विमान कंपन्यांचे अधिकारी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांसोबत प्रवासी म्हणून प्रवास करतील. यासोबतच क्रॅबिन क्रू मेंबर्सही उपस्थित राहणार आहेत.