Join us  

Akasa Air Sale : नवीन वर्षात विमान प्रवास करायचा आहे? अकासा एअर देतंय जबरदस्त डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 8:01 PM

Akasa Air Sale : नवीन एअरलाइन्स कंपनी अकासा एअरने (Akasa Air) अशा लोकांसाठी एक उत्तम ऑफर सादर केली आहे.

नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरुवात होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. तुम्ही ख्रिसमस (Christmas 2022) किंवा नवीन वर्षाच्या (New Year 2023) पार्श्वभूमीवर कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, नवीन एअरलाइन्स कंपनी अकासा एअरने (Akasa Air) अशा लोकांसाठी एक उत्तम ऑफर सादर केली आहे. अकासा एअर नवीन वर्षात प्रवास करणाऱ्यांसाठी एक सेल आणला आहे.

अकासा एअरने दिलेल्या माहितीनुसार, या सेलचे नाव Year End Sale असे आहे. याअंतर्गत 11 शहरांच्या फ्लाइट तिकिटांवर 10 टक्के सूट मिळणार आहे. म्हणजे कमी पैशात तुम्ही अनेक ठिकाणी प्रवास करू शकता, तेही विमान प्रवासाने. तुम्हालाही फ्लाइट बुकिंगवर 10 टक्के मोठी सूट (Discount Offers on Akasa Air) हवी असल्यास तुम्ही 12 डिसेंबर 2022 पर्यंत फ्लाइट बुक करू शकता.

एअरलाइन्सने ट्विटद्वारे दिली माहितीअकासा एअरने या खास ऑफरबद्दल (Special Offers on Akasa Air) ट्विटद्वारे माहिती दिली आहे. तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. या 'Year End Sale'द्वारे तुम्ही 450 हून अधिक फ्लाइट्सवर 10 टक्के पर्यंत सूट मिळवू शकता. परंतु तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की, ही सूट तुम्हाला फक्त 11 शहरांमध्येच मिळणार आहे. तुम्ही 12 डिसेंबर 2022 पर्यंत या सवलतीचा लाभ घेऊ शकता, असे अकासा एअरने म्हटले आहे.

या शहरांतील फ्लाइट्सवर मिळेल सूटदरम्यान, अकासा एअरमध्ये स्पेशल 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. याअंतर्गत 11 शहरांतील 450 फ्लाइट्सवर सूट मिळत आहे. यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, पुणे, लखनऊ, गुवाहाटी, विशाखापट्ट्नम, अगरतळा, कोच्ची आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे.

टॅग्स :विमानव्यवसाय