Lokmat Money > बिझनेस न्यूज > अक्षय्य तृतीयेलाही सोने घसरले

अक्षय्य तृतीयेलाही सोने घसरले

महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशीही सोने सराफा बाजारात चमकले नाही. १० ग्रॅ्रममागे ते २५० रुपयांनी स्वस्त होऊन ३०,१०० रुपयांवर आले.

By admin | Published: May 10, 2016 03:34 AM2016-05-10T03:34:43+5:302016-05-10T03:34:43+5:30

महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशीही सोने सराफा बाजारात चमकले नाही. १० ग्रॅ्रममागे ते २५० रुपयांनी स्वस्त होऊन ३०,१०० रुपयांवर आले.

Akshaya Tritiayla also lost gold | अक्षय्य तृतीयेलाही सोने घसरले

अक्षय्य तृतीयेलाही सोने घसरले

नवी दिल्ली : महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशीही सोने सराफा बाजारात चमकले नाही. १० ग्रॅ्रममागे ते २५० रुपयांनी स्वस्त होऊन ३०,१०० रुपयांवर आले. जागतिक बाजारातील मंदीही याला कारणीभूत ठरली. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला सोने २७,१०० रुपये होते.
औद्योगिक पट्ट्यात आणि
नाणे निर्मात्यांकडून मागणी नसल्यामुळे चांदीही किलोमागे ३५० रुपयांनी घसरून ४१,२०० रुपये झाली. दिल्लीच्या बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव १० ग्रॅममागे २५० रुपये खाली येऊन अनुक्रमे ३०,१०० व २९,९५० रु. झाला.
विदेशी बाजारात डॉलर बळकट असल्यामुळे व मागणी फारशी नसल्यामुळे दागिने निर्मात्यांकडून सोन्याला उठाव नव्हता, पर्यायाने ते स्वस्त झाले. सिंगापूरच्या बाजारातील भावावर सामान्यत: येथील सोन्याचे भाव ठरतात. तेथे सोने औंसमागे ०.७% खाली येऊन

1279.80
डॉलरवर आले. चांदी औंसमागे १७.३७ डॉलरने खाली आली.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची (दागिने, नाणी, अलंकार आदी) कमीतकमी का असेना खरेदीची परंपरा आहे. त्यामुळे सोन्याची घसरण काहीशी थांबल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Akshaya Tritiayla also lost gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.